नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील आरोपी हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. कारण सीबीआयनं चोक्सी आणि त्याची कंपनी गिताजंली जेम्सविरोधात नव्यानं गुन्हा दाखल केला आहे. इंडस्ट्रिअल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (IFCI) फसवणूक प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (CBI files fresh case of cheating against Mehul Choksi)
सीबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की, मेहुल चोक्सी आणि गितांजली जेम्सविरोधात IFCIचे एजीएम यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर प्राथमिक चौकशीनंतर चोक्सी आणि त्याच्या कंपनीविरोधात फसवणूक (कलम ४२०), फसवणुकीच्या उद्देशानं बनावट सही (४६८) या कलमांतर्गत गु्न्हा दाखल केला आहे.
तक्रारदार IFCI च्या अधिकाऱ्यानं सांगितलं की, सन २०१४ ते २०१८ या काळात चोक्सीनं २५ कोटी रुपयांचं कर्ज घेतलं. पण कालांतरानं चोक्सीकडून कर्जाची परतफेड होत नव्हती. यामध्ये बँकेशी केलेल्या कराराचं पालन चोक्सीकडून होत नसल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळं चोक्सीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.