सीबीएसई मंडळाच्या बारावीची ऑप्शनल परीक्षा ऑगस्टमध्ये

student
studentsakal
Updated on
Summary

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE)बारावीची परीक्षा रद्द(Twelth exam Canceled)केल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापन आणि त्यातून मिळणाऱ्या गुण त्यावर समाधान होणार नाही, अशा विद्यार्थ्याची सीबीएसईने ऑगस्ट मध्ये ऑप्शनल परीक्षा(Optional Exam)घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

मुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE)बारावीची परीक्षा रद्द(Twelth exam Canceled)केल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापन आणि त्यातून मिळणाऱ्या गुण त्यावर समाधान होणार नाही, अशा विद्यार्थ्याची सीबीएसईने ऑगस्ट मध्ये ऑप्शनल परीक्षा(Optional Exam)घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ही परीक्षा 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या कालावधीत होतील,अशी माहिती सीबीएसईने सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court)प्रतिज्ञापत्रात दिली असल्याचे सांगण्यात आले.(CBSE board conducts optional Exam for those not satisfy with internal marks)

बारावीचे मूल्यांकन आणि त्यासाठी मंडळाकडून कामकाज सुरू असून त्याप्रमाणे 31 जुलैपर्यंत बारावीचा निकाल जाहीर केला जाईल. यानंतर सीबीएसईकडून आपल्या निकालावर समाधानी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी पर्यायी परीक्षेसाठी नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन सुविधा पुरवली जाईल, अशी माहितीही मंडळाकडून देण्यात आली. ही ऑप्शनल परीक्षा केवळ मुख्य विषयांचीच परीक्षा घेण्यात येणार असून या परीक्षेत उमेदवाराने मिळविलेले गुण अंतिम मानले जातील. त्यात कोणताही बदल केला जाणार नाही.

student
परमबीर सिंग यांना पाच हजार रुपयांचा दंड

या परीक्षेचा निकाल कसा असावा किंबहुना मूल्यांकन फॉर्म्युला काय असावा याचं धोरण सीबीएसईने निश्चित केले आहे. त्यासाठी सुनिश्चित धोरण निश्चित करण्यासाठी, प्रत्येक शाळेला विश्वासार्ह संदर्भांचा वापर करून शालेय पातळीवरील भिन्नता लक्षात घेऊन आंतरिकरित्या गुणांचे मॉडरेशन करावं लागेल,असे प्रतिज्ञापत्रात म्हटले असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()