ठाणे - शिक्षक पात्रता परीक्षा केंद्रावर होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी, कॉपीमुक्त व बोगस उमेदवार रोखण्यासाठी सीसीटीव्हीसह फेस रीडिंग यंत्र बसविण्यात येणार असल्याची माहिती ठाणे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी दिली. तसेच ठाणे जिल्ह्यातील यंदा १५ मतदान केंद्रावर ११ हजार ८८ विद्यार्थी परीक्षेला बसणार असल्याची माहिती हि त्यांनी दिली.