केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा वाढदिवशीच उद्धव ठाकरेंना ठाकरेंना टोला, म्हणालेत पंतप्रधान... 

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा वाढदिवशीच उद्धव ठाकरेंना ठाकरेंना टोला, म्हणालेत पंतप्रधान... 
Updated on

नवी मुंबई : पंतप्रधान होण्याइतकी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ताकद नाही. देशभरात त्यासाठी पक्षाचे खासदार असावे लागतात, असा टोला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी लगावला आहे. नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या जागेत उलवे येथील डोंगरामधील वादग्रस्त लेण्यांना भेट देण्यास आठवले आज आले होते. त्याप्रसंगी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आठवले यांनी दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला.

बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वात आधी भीमशक्ती आणि शिवशक्तीचा नारा दिला होता. तो आजही आमच्या स्मरणात आहे. असे आठवलेंनी सांगितले. उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आठवले बोलले की, उद्धव ठाकरे आज आमच्या सोबत असते तर अधिकच आनंद झाला असता.

शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या सामानात आज उद्धव ठाकरे यांची वाटचाल सह्याद्रीकडून हिमालयाकडे असे लिखाण करण्यात आले आहे. शिवसेना यावरून उद्धव ठाकरे हे लवकरच देशाचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहत आहेत का? असा प्रश्न पत्रकारांनी आठवले यांना विचारला असता आठवलेंनी त्यांच्या शैलीत उत्तर दिले. मला ही मुख्यमंत्री व्हायचे आहे,  पण माझा एकही आमदार राज्यात निवडून येत नाही. उद्धव ठाकरे यांना शिवसेनेच्या 18 लोकांच्या जिवाववर पंतप्रधान होता येणार नाही.

पंतप्रधान होण्यासाठी महाराष्ट्रबाहेर विविध राज्यात सत्ता असावी लागते. मात्र शिवसेना फक्त महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्राच्या बाहेर शिवसेना वाढणार नाही. त्यामुळे पंतप्रधान होण्याइतकी उद्धव ठाकरे यांची ताकद नाही, असा टोला रामदास आठवले यांनी लगावला. तसेच सर्वजण आयोध्यावरून जाऊन आल्यावर आपण जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

( संकलन - सुमित बागुल )

central minister ramdas athawale pokes maharashtra CM uddhav thackeray on his birthday

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.