मुंबई - ग्रेट इंडिया पेनिन्सुला (जीआयपी) रेल्वेचा उत्तराधिकारी मध्य रेल्वेला शनिवारी ७२ गौरवशाली वर्षे पूर्ण केलं असून ७३ वे वर्षात पदार्पण केले आहे. यानिमित्ताने मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवानी यांनी प्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
आशियातील पहिली ट्रेन मुंबई ते ठाणे दरम्यान १६ एप्रिल १८५३ रोजी धावली. जसजशी वर्षे उलटली, तसतशी ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेचा विस्तार होत गेला. १९०० मध्ये ग्रेट इंडिया पेनिन्सुला(जीआयपी) रेल्वे कंपनीमध्ये इंडियन मिडलँड रेल्वे कंपनीचे विलीनीकरण झाल्यानंतर, तिची सीमा उत्तरेला दिल्ली, ईशान्येला कानपूर व अलाहाबाद आणि पूर्वेला नागपूरपासून दक्षिण-पूर्वेला रायचूरपर्यंत वाढवण्यात आली.
अशा प्रकारे, मुंबई द्वारे भारताच्या जवळजवळ सर्व भागांशी संपर्क साधला गेला. ५ नोव्हेंबर १९५१ रोजी निजाम राज्य, सिंधिया राज्य आणि ढोलपूर राज्य रेल्वे यांचे एकत्रीकरण करून मध्य रेल्वेची स्थापना करण्यात आली. सध्या मध्य रेल्वेवर मुंबई, भुसावळ, नागपूर, सोलापूर आणि पुणे असे ५ विभाग आहेत. मध्य रेल्वेचे नेटवर्क महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटक राज्यांमध्ये ४,२१९ मार्ग किमीवर पसरलेले आहे आणि एकूण ४७१ स्थानके आहेत.
७१ वर्षांत उल्लेखनीय कामगिरी
पहिली शताब्दी एक्सप्रेस,
पहिली जन शताब्दी एक्सप्रेस,
पहिली तेजस एक्सप्रेस .
उपनगरीय लोकल फेऱ्यांची सेवा ५१९ वरून १८५० पर्यत .
३ डब्यांपासून सुरू झालेल्या उपनगरीय सेवा हळूहळू ९ डब्यांच्या, १२ डब्यांच्या आणि १५ डब्यांच्या काही सेवांपर्यंत वाढल्या
रेल्वे मार्गिकेचे दुहेरीकरण, तिसरी व चौथी लाईन, विद्युतीकरण,मध्य रेल्वेने या वर्षात आतापर्यंत विक्रमी १४७.७७ किमीचे मल्टी ट्रॅकिंग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.