Central Railway : मरेची नाईट कोर्ट मोहिम; रेल्वेनियम मोडणाऱ्या ३११ जणांवर गुन्हे दाखल

रेल्वेचे नियम मोडणाऱ्या प्रवाशांविरोधात मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने बुधावरपासून (ता.२९ ) नाईट कोर्ट मोहिम राबविण्यात आली आहे.
Central Railway
Central Railwayesakal
Updated on

मुंबई - रेल्वेचे नियम मोडणाऱ्या प्रवाशांविरोधात मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने बुधावरपासून (ता.२९ ) नाईट कोर्ट मोहिम राबविण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत आरपीएफ पोलिसांनी ३११ जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. त्यांच्याकडून ४६ हजार ९५० रुपये दंड वसूल केल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार,मुंबई विभागाच्या आरपीएफ पोलिसांनी संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांना रोखण्यासाठी नाईट कोर्ट मोहिम बुधवारी हाती घेतली होती. हि मोहिनी कल्याण, टिटवाळा, बदलापूर, पनवेल, ठाणे, मुंब्रा, दिवा आणि डोंबिवली या स्थानकांवर राबविण्यात आली होती.

यामध्ये आरक्षित डब्यांमध्ये अनधिकृतपणे प्रवेश केल्याबद्दल कलम १५५ भारतीय रेल्वे कायदा अंतर्गत १९७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. तर कलम १४७ नुसार रेल्वे परिसरात घुसखोरी केल्याप्रकरणी ९९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेल्वे परिसरात अनधिकृतपणे फेरी मारणे आणि भीक मागणे यासाठी कलम १४४ भारतीय रेल्वे कायदा अंतर्गत १३ जणांवर गुन्हा दाखल.

रेल्वे परिसरात मद्यपान करून उपद्रव निर्माण केल्याप्रकरणी १ व्यक्तीवर गुन्हा दाखल. विशेष म्हणजे कल्याण येथील विभागीय रेल्वे दंडाधिकारीयांच्या रात्र न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एकूण ३११ व्यक्तींवर खटला चालवला गेला, ज्यामधून एकूण ४६ हजार ९५० रुपये दंड वसूल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.