मुंबई : सरसकट लोकल प्रवासाच्या निर्णयावर खल सुरू असताना रेल्वेस्थानकाचे वाहनतळ सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. मुंबई महानगरामध्ये विविध स्थानकांवर एकूण 15 एकर जागेत वाहनतळाची व्यवस्था आहे. वाहनतळ प्रवाशांसाठी खुले करण्याच्या निर्णयामुळे पार्किंगच्या कटकटीला पूर्णविराम मिळणार आहे.
कोरोनामुळे लोकल सेवा स्थगित झाल्याने रेल्वेस्थानकाबाहेरील वाहनतळ बंद केले होते; मात्र या निर्णयामुळे पार्किंगसाठीची 58,136 चौरस मीटर जमीन आता पुन्हा उपलब्ध होईल. यासोबतच मध्य रेल्वेने पार्किंगसाठी 21,108 चौरस मीटर जागेची अतिरिक्त जागाही शोधून काढली आणि तिथे पार्किंगची सुविधा निर्माण केली आहे. रेल्वेस्थानकाच्या क्षमतेच्या आधारावर तीन महिने ते तीन वर्षांच्या कालावधीसाठी रेल्वेने पे-अँड पार्कचे कंत्राट दिले आहे.
मुंबई महानगरात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते हार्बर मार्गावरील पनवेल आणि पूर्व उपनगराच्या उत्तरेकडील टोकावरील अंबरनाथ, बदलापूर अशा स्थानकांवर प्रवाशांच्या सोईसाठी एकूण 62 पे-अँड पार्क पाईंट्स आहेत; मात्र कोरोनाकाळात सार्वजनिक वाहतुकीपेक्षा स्वतंत्र वाहन प्रवास करण्यावर नागरिक भर देत असल्याचे चित्र आहे. दुचाकी वाहन खरेदीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे वाहनतळावर गाडी पार्किंगसाठी पहिल्याप्रमाणे गर्दी होईल का ते पाहावे लागणार आहे.
कल्याण, पनवेल आणि ठाणे या महत्त्वाच्या आणि गर्दीच्या स्थानकामध्ये एकूण 20,739 चौरस मीटर जमीन वाहनतळासाठी दिली आहे; तर सीएसएमटी, कुर्ला एलटीटी, कुर्ला आणि घाटकोपर स्थानकांवर ऍचप-आधारित टॅक्सी, बस आणि इलेक्ट्रिक, थ्री-व्हीलरसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था आहे.
रेल्वेस्थानकांच्या बाहेर पार्किंगची मोठी समस्या उत्पन्न झाली असून, अनेक प्रवासी स्थानकाबाहेर वाहने पार्क करतात. परिणामी वाहतूक कोंडीची समस्या उत्पन्न झाली.
- सुभाष गुप्ता,
सदस्य, राष्ट्रीय रेल्वे सल्लागार समिती
Central Railway parking lot to be reopened Passengers will get relief
-------------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.