मध्य रेल्वेने लॉकडाऊनच्या काळात आलेल्या तब्बल 'इतक्या' तक्रारींचे केले निराकरण; प्रवाशांनी मध्य रेल्वेचे मानले आभार..

central railway
central railway
Updated on

मुंबई: लॉकडाऊन कालावधीतही रेल्वेकडे अनेक सूचना, मागण्या व तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मध्य रेल्वेला रेल मददच्या माध्यमातून 23 मार्च ते 18 जून पर्यंत 910 प्रवाशांच्या विविध समस्या प्राप्त झाल्या. 18 जुन्या तक्रारींसह प्रत्येक प्रकरणात त्वरित कारवाई करुन एकूण 923 तक्रारींचे निराकरण केले असल्याचे मध्य रेल्वेने सांगितले आहे.

कोरोनाच्या संकटात भारतीय रेल्वे सक्रिय भूमिका पार पाडत आहे.मध्य रेल्वेला 23 मार्च ते 18 जून या काळात केंद्रीय सार्वजनिक तक्रार निवारण व देखरेख प्रणाली च्या माध्यमातून भागधारकांच्या 412 तक्रारी प्राप्त झाल्या.

मध्य रेल्वेच्या सार्वजनिक तक्रार सेलने जुन्या 148 तक्रारींसह प्राप्त नव्या तक्रारींवर त्वरित कारवाई करीत 93.21 टक्के म्हणजेच एकूण 560 पैकी 522 प्रकरणांचे निराकरण केले. रेल मदद आणि सेंट्रलाइज्ड पब्लिक ग्रिव्हेनेसेस रिड्रेस एंड मॉनिटरिंग सिस्टमद्वारे रेल्वेकडे तक्रारी येतात. 

मध्य रेल्वेच्या पब्लिक ग्रिव्हेनेसेस सेलने अशा उद्भवलेल्या बाबींवर तातडीने कारवाई केली.मध्य रेल्वेच्या सामान्य प्रशासना अंतर्गत असलेल्या सार्वजनिक तक्रार कक्षाने, प्रवासी भागधारकांनी उपस्थित केलेल्या समस्यांचे निराकरण करण्यात उल्लेखनीय कामगिरी दर्शविली आहे.

वरुण डंबल यांनी ईमेल पाठवून अत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीस मदत करण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत कोविड बाधितांसाठी रेल्वेचे डबे तयार करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. तर देवांश गुप्ता यांनीही तिकीटाच्या परताव्यासाठी त्वरित दिलेल्या प्रतिसादाबद्दल आभार मानले आहे.

central railway solved all complaints of people 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()