Bandra Terminus चेंगराचेंगरीनंतर मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! Platform Ticket ची विक्री बंद, पण किती दिवसांसाठी? जाणून घ्या

Bandra Terminus Stampede Incident: वांद्रे टर्मिनसमध्ये चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. यात काही जण जखमी झाले आहेत. यानंतर मध्य रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे.
Bandra Terminus Stampede Incident
Bandra Terminus Stampede IncidentESakal
Updated on

दिवाळीच्या गर्दीमुळे मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी झाली असून १० जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेचे गांभीर्य आणि स्थानकांवर होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबईतील काही स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री बंद केली आहे. यामुळे आता प्रवाशांना सोडण्यासाठी लोकांना स्थानकाच्या बाहेरून परतावे लागणार आहे.

यामध्ये प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, पुणे, नागपूर इत्यादी स्थानकांचा समावेश आहे. स्थानकांवरील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, छठ आणि दिवाळीसारख्या मोठ्या सणांमुळे मुंबईत राहणारे परप्रांतीय मोठ्या संख्येने त्यांच्या घरी परतत आहेत. त्यामुळे गाड्यांची गर्दी वाढली आहे. या प्रवाशांना ट्रेनमध्ये बसवण्यासाठी लोक मोठ्या संख्येने स्टेशनवर पोहोचत आहेत.

Bandra Terminus Stampede Incident
Bandra Stampede: भारतीय चेंगराचेंगरीत गमावतायेत आयुष्य! मागील काही वर्षांतील या घटना आठवा

अशा परिस्थितीत गर्दीवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. ही अतिरिक्त गर्दी रोखण्यासाठी रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री तातडीने बंद केली आहे. हे निर्बंध १३ दिवसांसाठी लागू करण्यात आले आहेत. या व्यवस्थेअंतर्गत, या १३ दिवसांत ज्यांच्याकडे प्रवासाचे तिकीट आहे त्यांनाच मुंबईच्या स्थानकांवर प्रवेश मिळेल. त्याच वेळी ट्रेनमध्ये चढण्यासाठी स्टेशनवर पोहोचणाऱ्यांना स्टेशनच्या बाहेरून परतावे लागेल.

Bandra Terminus Stampede Incident
Bandra Stampede: "रेल्वे प्रशासनाची बेफिकिरी जिवावर बेतली..."; वांद्रे चेंगराचेंगरी दरम्यान पोलीस काय करत होते?

वांद्रे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या या घटनेत एकूण १० जण गंभीर जखमी झाले आहेत. यापैकी ५ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तीन जणांना प्राथमिक उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तसेच दोन जणांना मोठ्या रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. रविवारी सकाळी मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकावर गोरखपूरला जाणाऱ्या लोकांची मोठी गर्दी होती. ट्रेन प्लॅटफॉर्मवर येताच ट्रेनचे दार उघडण्यापूर्वीच लोक आत जाण्यासाठी धडपड करू लागले. त्यामुळे काही वेळातच चेंगराचेंगरी झाली. हा अपघात २२९२१ वांद्रे-गोरखपूर एक्स्प्रेस गाडी सुटण्याच्या वेळी झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.