Railway: भंगार विक्रीत मध्य रेल्वे अव्वल; तब्बल इतक्या कोटींची केली कमाई

Railway
Railwayesakal
Updated on

Railway: मध्य रेल्वेच्या शून्य भंगार मोहिमेअंतर्गत गेल्या आठ महिन्यात भंगार विक्रीतून २४८ कोटीपेक्षा जास्त कमाई केली आहे. शून्य भंगार मोहिम मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे, सोलापूर, भुसावळ आणि नागपूर विभागाच्या विविध ठिकाणी राबवण्यात आली होती. तसेच उद्दिष्टाच्या तुलनेने ३४.०८ टक्क्यांची भंगार विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे.

Railway
Railway: मध्य रेल्वेने कसली कंबर; १००हुन अधिक तिकीट दलालांना केली अटक

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार,वापरात नसलेले रेल्वे रूळ प्रत्येक डेपोत जमा करून भंगारात देण्याचे नियोजन केले. यासह इतर ठिकाणांचे भंगार उचलेले आहे. यामध्ये लोह, स्टील, अ‍ॅल्युमिनियम, पितळ, तांबे व इतर धातूच्या भंगाराची विक्री केली आहे.

यासह मोडीत काढलेले रेल्वेचे डबे, वाघिणी, इंजिने, जुने डबे, माल डबे, चाके यांची विक्री केली आहे. यामध्ये एप्रिल आणि ३० नोव्हेंबर २०२३ पर्यत भंगार विक्रीतून २४८.०७ कोटी एवढा महसूल मध्य रेल्वेने मिळविले आहे. मध्य रेल्वेने ठरवलेल्या विक्री उद्दिष्टाच्या तुलनेत मिळालेलं उत्पन्न तब्बल ८२.६९ टक्के इतके उल्लेखनीय असून सदर बाब १८५ कोटींच्या आनुपातिक उद्दिष्टाच्या तुलनेने ३४.० टक्काची लक्षणीय वाढ आहे.

Railway
Railway: ख्रिसमस अन् नववर्षानिमित्त गोव्याला जायचंय? रेल्वे सोडणार १४ विशेष गाड्या

कोणत्या विभागाची किती कमाई (कोटीमध्ये)

विभाई- कमाई

मुंबई - ३६.३९ कोटी

भुसावळ - ४९.२० कोटी

पुणे - २२.३१ कोटी

सोलापूर - २०.७० कोटी

नागपूर - २२.३२ कोटी

माटुंगा डेपो - ४०.५८ कोटी

इलेक्ट्रिक लोको शेड डेपो, भुसावळ - २३.६७ कोटी

इतर ठिकाणी- ३२.९० कोटी 

Railway
Dadar Railway Platform : प्रवाशांना गोधळातुन मिळाली सुटका! दादर स्थानकातील प्लॅटफॉर्म सलग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.