प्रवाशांपासून सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी मध्य रेल्वेचा 'हा' नवीन प्रयोग; वाचा सविस्तर बातमी 

ticket checker
ticket checker
Updated on

मुंबई:  कोविड -19 चा धोका टाळण्यासाठी मध्य रेल्वेने तिकीट तपासणीकांना पोर्टबल मिनी लाऊडस्पीकर म्हणजेच नेकबँड पोर्टेबल पब्लिक अॅड्रेस (पीए) देण्यात आले आहे. याद्वारे प्रवाशांना सुचना किंवा तिकीट तपासतांना सोशल डिस्टन्सिंग ठेवून तपासता येणार आहे. मध्य रेल्वेकडून सध्या असे 50 नेकबँड पोर्टेबल पब्लिक अॅड्रेस मशिन प्रायोगिक तत्वावर विकत घेण्यात आले आहे. 

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने तिकीट तपासणी कर्मचा-र्यांना नेकबँड पोर्टेबल पब्लिक अॅड्रेस (पीए) प्रणाली देण्यात आली आहे. सुरुवातीला असे 50 संच खरेदी केले गेले असून येत्या काही दिवसांत अन्य तिकिट तपासणी कर्मचा-र्यांनाही ते देण्यात येणार आहे.

यामुळे प्रवाशांशी सोशल डिस्टन्सिंग पाळून संवाद साधण्यास मदत होणार आहे. तर फलाटावर सोशल डिस्टंसिंग पाळण्यासाठी तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांना याच पोर्टबल मिनी लाऊडस्पीकर मधुन प्रवाशांना सूचना सुद्धा देता येणार आहे.

याशिवाय, मुंबई विभागाच्या वाणिज्य शाखेने तिकीट तपासणी कर्मचा-र्यांना 1250 एन 95 मास्क, 1250 फेस शिल्ड, 500 पीपीई किट, 7000 हेड कव्हर कॅप्स, हँड ग्लोव्हज आणि सॅनिटायझर्स उपलब्ध करून दिले आहे.

आघाडीवरील कर्मचाऱ्यांना सर्व संभाव्य सुरक्षा सामग्रीने सज्ज ठेवून कोणतीही भीती न बाळगता कर्मचाऱ्यांना आपले कर्तव्य पार पाडता यावे यासाठी मध्य रेल्वे सर्वतोपरी मदत करत असल्याचे मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक शलभ गोएल यांनी सांगितले.

ही आहे पोर्टेबल पीए सिस्टमची वैशिष्ट्ये:
 
-- 12व्हॅट च्या जास्तीत जास्त आवाजाच्या आउटपुटसह मोहक आणि कॉम्पॅक्ट अल्ट्रा पोर्टेबल पीए एम्पलीफायर आहे. 
-- हेडबँड मायक्रोफोनला जोडण्यासाठी 3.5 मिमी मायक्रोफोन इनपुट सॉकेट आणि डीव्हीडी, सीडी किंवा एमपी 3  ला जोडण्यासाठी 3.5 मिमी लाइन इनपुट सॉकेट.
-- वापरण्यास सोयीस्कर.

संपादन : अथर्व महांकाळ 

central railway will try this new experiment for social distancing 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.