मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आपण मनावर दगड ठेवून मुख्यमंत्री केलं, असा पुनरुच्चार भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. रुसून न बसता केंद्रातल्या नेत्यांचा आदेश आपण ऐकल्याचंही चंद्रकांत पाटलांनी सांगितलं. पनवेलमधल्या भाजपा कार्यकारिणीच्या बैठकीत पाटील बोलत होते. (Chandrakant Patil expressed feeling about eknath shinde CM)
एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रिपदावरुन चंद्रकांत पाटलांनी (BJP Chandrakant Patil) नाराजी व्यक्त केली आहे. पाटील म्हणाले, "केंद्रातील नेत्यांनी आदेश दिला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) झाले. मनावर दगड ठेवून आपण सर्वांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्री केलं. आपल्याला दुःख झालं. पण आपण दुःख पचवून पुढे गेलो कारण आपल्याला गाडा पुढे हाकायचा होता.
जेव्हा पासून शपथ घेतली तेव्हा सर्व मुंबईत आहेत त्यामुळे आता चला आपल्या घरी कामाला लागू जेव्हा सर्व ठरेल तेव्हा तुम्हाला बोलावलं जाईल आणि तेही वेळेत. नगरपालिका, पालिका निवडणुक लागली आहे. आपल्या मुंबई महापालिका जिंकायची आहे. आगामी काळात आपण खूप परिश्रम घेऊ.नेत्यांनी आदेश करायचा नसतो इच्छा व्यक्त करायची असते आणि आपण त्याच पालन करायचं असतं, असं आवाहनही यावेळी चंद्रकांत पाटलांनी उपस्थित नेत्यांना केलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.