Latest Mumbai News | विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्र आणि मतदारसंघ कार्यालयामुळे वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये, यासाठी रस्ते वाहतुकीत बदल केले आहेत. मतदान प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण होऊ नये, तसेच मतदान केंद्रावर साहित्य वेळेत पोहोचावे यासाठी मुंबईत अनेक ठिकाणी रस्ते वाहतुकीत बदल केल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.