Mumbai Traffic Update : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर रस्ते वाहतुकीत बदल

७ जून पासून १९ जूनपर्यंत २४.०० वा. पर्यंत हे बदल लागू असणार आहेत.
Mumbai Traffic Update
Mumbai Traffic UpdateSakal
Updated on

Mumbai News : मानखुर्द वाहतूक विभागात बकरी ईदनिमित्ताने कुर्बानीसाठी बकरे वाहतूक केली जाते. ही वाहने मानखुर्द घाटकोपर लिंकरोड वरील शिवाजीनगर जंक्शन, (लोटस जंक्शन), बैगनवाडी जंक्शन, आय.ओ.सी. जंक्शन मुंबई येथून येतात. यामुळे वाहतुक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी वाहतुकीत बदल केले आहेत. ७ जून पासून १९ जूनपर्यंत २४.०० वा. पर्यंत हे बदल लागू असणार आहेत.

अ) प्रवेश बंदी -

खालील रस्त्यांवर सर्व प्रकारच्या जड व माल वाहनांना (बेस्ट बस आणि जनावरे वाहतूक करणारी वाहने वगळून) २४ तास प्रवेश बंदी करण्यात येत आहे.

-वामन तुकाराम पाटील मार्ग पांजरपोळ जंक्शनपासून गोवंडी रेल्वे स्टेशन पश्चिम रोडवरील झटका गेटसमोरील जंक्शनपर्यंत.

- गौतमनगर रोड :- शिवाजीनगर जंक्शनपासून गोवंडी रेल्वे स्टेशन पश्चिम रोडवरील झटका गेटसमोरील जंक्शनपर्यंत

- पेरीफेरी मार्ग: एरीस जंक्शन पासून गोवंडी रेल्वे स्टेशन पश्चिम रोडवरील झटका गेटसमोरील जंक्शनपर्यंत

- देवनार रोड/गोवंडी स्टेशन पश्चिम रोड तानाजी मालुसरे चौक पासून गोवंडी रेल्वे स्टेशन रोडवरील झटका गेटसमोरील जंक्शनपर्यंत.

ब) एक दिशा मार्ग

खालील रस्त्यांवर सर्व प्रकारच्या जड व माल वाहनांना २४ तास प्रवेश बंदी करण्यात येत आहे.

१६ जून पासून १९ जूनपर्यंत रात्री १२ वाजे पर्यंत गोवंडी स्टेशन पश्चिम रोड तानाजी मालुसरे चौक पासून-गोवंडी रेल्वे स्टेशन-गोवंडी स्टेशन पासून झटका गेट पर्यत आवश्यकतेनुसार ऐकेरी वाहतुक करण्यात येईल.

क) पर्यायी मार्ग -

चामन तुकाराम पाटील मार्गाने पांजरपोळ जंक्शन येथून गोवंडी रेल्वे स्टेशन पश्चिम रोडवरील झटका गेटकडे जाणारी वाहने ही व्ही. एन. पुरव मार्ग, सायन पनवेल महामार्ग, घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडचा वापर करतील.

गौतमनगर रोडने शिवाजीनगर जंक्शनपासून झटका गेटकडे जाणारी वाहने घाटकोपर- मानखुर्द लिंक रोडने छेडा नगर जंक्शनने इच्छित स्थळी जातील.

पेरीफेरी मार्गावर एरीस जंक्शन पासून झटका गेटकडे जाणारी वाहने घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडने छेडा नगर जंक्शनने इच्छित स्थळी जातील.

देवनार रोड/गोवंडी स्टेशन पश्चिम रोड - तानाजी मालुसरे चौक पासून जाणारी वाहने घाटकोपर - मानखुर्द लिंक रोडने छेडा नगर जंक्शनने इच्छित स्थळी जातील.

ड) जनावरे वाहतूकसाठी सुचना-

१. देवनार पशुवधगृहाच्या बकरी गेट येथे बकऱ्या उतरून घेतल्यानंतर सदर वाहनांनी सरळ पुढे पेराफेरी मार्गाने जावून गौतम रोडचा वापर करावा.

२ . मधुकर कदम मार्ग हा दुतर्फा वाहतूकीस खुला राहिल.

३. मुंबई, ठाणे व नवी मुंबई कडून देवनार पशुवधगृह परीसरात येण्यासाठी छेडानगर मार्गे घाटकोपर मानखुर्द लिंक रोडचा वापर करावा.

ई) पार्कीग मनाई -

१. पेराफेरी मार्ग-एरीस जंक्शन पासून गोवंडी रेल्वे स्टेशन पश्चिम रोडवरील झटका गेटसमोरील जंक्शनपर्यंत.

२. गोवंडी स्टेशन पश्चिम रोड-तानाजी मालुसरे चौक पासून त्या रोडवरील झटका गेटसमोरील जंक्शनपर्यंत.

३. गौतमनगर रोडः-शिवाजीनगर जंक्शनपासून गोवंडी रेल्वे स्टेशन पश्चिम रोडवरील झटका गेटसमोरील जंक्शनपर्यंत

४. मधुकर कदम मार्ग-बैंगनवाडी जंक्शनपासून तानाजी मालुसरेचौका पर्यंत.

५. वामन तुकाराम पाटील मार्गः एन जी आचार्य मार्गावरील बोराबादेवी जंक्शनपासून गोवंडी रेल्वे स्टेशन पश्चिम रोडवरील झटका गेटसमोरील जंक्शनपर्यंत, गोवंडी रेल्वे स्टेशन ब्रीजवरील सर्व मार्गावर दोन्ही बाजूस वाहने उभी करण्यास प्रतिबंध राहिल.

फ) पार्कीग व्यवस्था -

मनपा एम पूर्व विभागामार्फत पेरीफेरी रोडवरील कत्तलखाना आणि ६०० टैनामेंट बिल्डींगजयळ एका मोकळ्या जागेत जनावरे घेवून येणारे व जनावरे खरेदी करण्यासाठी येणाऱ्या वाहनांसाठी तात्पुरती पार्कीगची सुविधा करण्यात येत आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.