मुंबई : जगभर पसरलेल्या कोरोना रोगाच्या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर अखील भारतीय स्तरावर संघ लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या परिक्षांच्या वेळापत्रकांत बदल करण्यात आला आहे. या बदललेल्या वेळापत्रकानुसार संघ लोकसेवा आयोगाच्या(युपीएससी)-2019 च्या मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना 3 मे नंतर बोलावण्यात येणार आहे.याबाबत उमेदवारांना कववण्यात येईल,असे नवी दिल्ली येथील संघ लोकसेवा आयोगाच्या कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
अखील भारतीय स्तरावर संघ लोकसेवा आयोग दरवर्षी विवीध प्रकारच्या सेवेसाठी परिक्षांचा कार्यक्रम ,वेळापत्रक जाहीर करत असते. या वेळापत्रकानुसार पुर्व परिक्षा ,मुख्य परिक्षा आणी तोंडी परिक्षा(मुलाखत) असे साधारण याचे स्वरूप असते. यामधे अखील भारतीय सनदी सेवा,भारतीय पोलीस सेवा,भारतीय विदेशी सेवा,भारतीय महसूल सेवा आदी प्रकारच्या सेवेसाठी संघ लोकसेवा आयोगाकडून परिक्षा घेतली जाते.मार्च,एप्रिल या कालावधीत या परिक्षेचा मुलाखतीचा कार्यक्रम पार पाडला जातो.सध्या युपीएससी 2019 या परिक्षेच्या मुलाखती सुरू होत्या.
या मुलाखती देशभर सुरू असलेल्या लॉंकडाऊनमुळे तुर्त स्थगित करण्यात आल्या असून याबाबतचे वेळापत्रक 3 मे नंतरउमेदवारांना कळवण्यात येणार आहे.तर युपीएससी 2020-पुर्व परिक्षा, अभियांत्रिकी सेवा मुख्य परिक्षा,जिआँलॉंजी मुख्य परिक्षा यांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. आगामी काळात देशातील परिस्थिती पाहून याबाबत काही निर्णय झालास तर तो आयोगाच्या संकेतस्थळावर टाकण्यात येईल,असे आयोगाने म्हटले आहे. सन 2020 मधील एकसमाईक वैद्यकिय सेवा,भारतीय वित्त सेवा तसेच भारतीय संख्याशास्त्र सेवाचे वेळापत्रक पुढे ढकलले आसल्याबद्दल आयोगाने कळवले आहे.तर सिएपीएफ व एनडीऐ परिक्षांचा कार्यक्रम देखील पुढे ढकलण्यात आला आसल्याचे आयोगाच्या निवेदनात म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.