मुंबई : ST महामंडळाच्या तीन संवर्गातील प्रत्येकी 15 टक्के बदली प्रक्रीयामध्ये सावळा गोंधळ दिसून येत आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार 10 ऑगस्टपर्यंतच या विनंती बदल्या करायच्या असताना, महामंडळातील बदल्यांची प्रक्रीया अद्याप पुर्णच झाली नसून बदल्या रेंगाळत असल्याचे दिसून येत आहे. त्यामूळे कर्मचारी अधिकाऱ्यांचा जिव टांगणीला लागला आहे.
तब्बल पाच महिन्यांपासून बंद असलेली एसटीची सेवा गुरूवारी राज्यात सुरू करण्यात आली. मात्र, त्यापुर्वीच एसटीतील कर्मचाऱी अधिकाऱ्यांना बदलीचे डोहाळे लागले आहे. राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभुमीवर फक्त 15 टक्केच बदल्या करण्याचे आदेश दिले असून या बदल्या 10 ऑगस्ट पर्यंतच करण्याची मुदत होती. मात्र, महामंडळातील बदल्यांची यादीवर अद्याप शिक्कामोर्तब होत नसल्याचे दिसून येत आहे.
सेवा जेष्ठता यादीनुसार विनंती बदली एसटीला करायच्या आहे. त्यामध्ये चालक, वाहक, मॅकेनिकल संवर्ग, पर्यवेक्षक संवर्ग, अधिकारी संवर्ग या तिन संवर्गाचा समावेश आहे.
त्यामधून प्रत्येकी 15 टक्के बदल्या केल्या जाणार आहे. तर एसटी महामंडळात एकूण सुमारे 1 लाख 4 हजार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची संख्या आहे. त्यापैकी आतापर्यंत सुमारे 10 हजार विनंती बदलीचे अर्ज एसटी महामंडळाकडे आधीच प्रलंबीत आहे. मात्र, या 15 टक्के बदल्यांमध्ये राजकीय हस्तक्षेप होऊन मर्जीतील कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या यादीवरच शिक्कामोहर्तब होणार असल्याने, एसटी कर्मचारी, अधिकाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
कोकणातील बदलीवर मेहेरनजर
कोकणात नियुक्त एसटी कर्मचाऱ्यांची तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मोठ्या प्रमाणात बदल्या केल्या होत्या, त्यानंतर 2017 नंतर भरती प्रक्रियेत नव्याने नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी बदली म्हणजेच राजीनामा असा धोरणात्मक निर्णय घेतला होता. त्यानुसार कर्मचाऱ्यांनी स्टँम्प पेपरवर तसा राजीनामा घेण्याची प्रक्रीया सुद्धा करण्यात आली आहे. मात्र, या बदली प्रक्रीयेमध्ये सर्वात जास्त कोकणातील कर्मचारी, अधिकाऱ्याचा विचार केल्या जात असल्याचेही सांगितल्या जात आहे.
एसटीच्या संचालकाला स्वायत्ता
राज्यातील शासकीय, निमशासकीय प्रशासनाने 15 टक्के बदली राबवण्यासाठी 10 ऑगस्टपर्यंतच राज्य शासनाने मुदत दिली होती. मात्र, एसटी महामंडळाच्या बदल्या अद्याप प्रलंबीतच आहे. यामध्ये राज्य शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी करायची नसल्यास एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाला स्वतहाचा निर्णय घेण्याची स्वायत्ता आहे. मात्र, बदली प्रक्रीयेच्या संदर्भात अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याची माहिती अधिकृत सुत्रांनी सांगितले आहे.
मोठी बातमी - सुशांत सिंह राजपूत प्रकरणः शिवेसेनेवर गंभीर आरोप करत नितेश राणे CBI ला करणार 'ही' विनंती
बदली प्रक्रीया राबविणाऱ्या अधिकाऱ्यांचीच बदली
एसटी महामंडळातील कर्मचारी वर्ग आणि औद्योगीक संबंध विभागाच्या महाव्यवस्थापक शैलेश चव्हाण यांना कोरोना बाधा झाल्याने, राज्य शासनाचे अधिकारी अशोक फळणीकर यांच्याकडे पदभार होता. मात्र, बुधवारी त्यांची बदली होऊन आता, विद्युत मंडळातील महापारेषण विभामध्ये नियुक्ती मिळाली आहे. त्यामूळे आता, कर्मचारी व वर्ग व औद्योगीक संबंध पदाचा भार एसटीचे वाहतुक महाव्यवस्थापक राहूल तोरो यांना दिला आहे. मात्र, ऐन बदली प्रक्रीयेतच अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असल्याने एसटीतील बदली प्रक्रीयेवर संशय व्यक्त होत आहे.
शासन निर्णयाप्रमाणे एसटी कर्मचा-यांच्या विनंती बदल्या नियमानुसार वेळेत करणे गरजेचे आहे. परंतू अद्यापपर्यंत बदली प्रक्रीया रखडली आहे. त्यामुळे आर्थिक हितसंबंधातून बदल्या होणार आहेत का? असा प्रश्न निर्माण होत आहे. यापूर्वी सुद्धा नियमबाह्य आर्थिक व्यवहारातून बदल्या झालेल्या आहेत. त्यामूळे यावेळी होणाऱ्या बदल्या पारदर्शक आणि सेवाजेष्ठतेनुसार होणे गरजेचे आहे. असं महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) चे सरचिटणीस मुकेश तिगोटे म्हणालेत
तसंच, राज्य एसटी कामगार संघंटना अध्यक्ष संदिप शिंदे म्हणालेत की, राज्य शासनाने दिलेल्या नियमाप्रमाणे कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या सोईच्या ठिकाणी त्यांच्या विनंतीनुसार बदली होणे आवश्यक आहे. ही कारवाई त्वरीत राबवावी.
( संपादन - सुमित बागुल )
chaos over transfers in state transport department fifteen percent transfer process not happening properly
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.