Theory of Evolution चार्ल्स डार्विनचा उत्क्रांतिवादाचा सिद्धांत ‘एनसीईआरटी’ने वगळला

जगभरातील प्रत्येक देशातील अभ्यासक्रमात शिकवला जाणारा चार्ल्स डार्विनचा उत्क्रांतिवादाचा सिद्धांत अभ्यासक्रमातून वगळण्याचा निर्णय घेतला.
Evolution
Evolutionsakal
Updated on
Summary

जगभरातील प्रत्येक देशातील अभ्यासक्रमात शिकवला जाणारा चार्ल्स डार्विनचा उत्क्रांतिवादाचा सिद्धांत अभ्यासक्रमातून वगळण्याचा निर्णय घेतला.

मुंबई - मुघल साम्राज्य आणि स्वातंत्र्य संग्रामाचा काही अंश इतिहासाच्या पुस्तकातून वगळल्यानंतर आता ‘नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग’ने (एनसीईआरटी) जगभरातील प्रत्येक देशातील अभ्यासक्रमात शिकवला जाणारा चार्ल्स डार्विनचा उत्क्रांतिवादाचा सिद्धांतही अभ्यासक्रमातून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे देशभरातील विज्ञाननिष्ठ, विज्ञानप्रेमी आणि विचारवंतांनी या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

देशभरातील तब्बल १ हजार ८०० हून अधिक तज्ज्ञ, विचारवंतांनी याबाबत ‘एनसीईआरटी’ ला पत्र लिहून आपली नाराजी प्रकट केली आहे. विज्ञानाच्या अभ्यासक्रमातून डार्विनचा सिद्धांत काढून टाकणे म्हणजे शिक्षणातील एक प्रकारे फसवणूकच आहे, शिवाय विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या ज्ञानापासून वंचित ठेवून कोणते ज्ञान देणार आहोत? असा सवाल विचारवंत आणि तज्ज्ञांनी आपल्या पत्रातून केला आहे.

‘एनसीईआरटी’ने विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचे ओझे कमी करण्याच्या नावाखाली उत्क्रांतिवादाचा सिद्धांत आणि त्याचे नववी, दहावीच्या विज्ञानाच्या पुस्तकातील प्रकरण वगळले आहे. उपरोक्त पत्रासोबत ब्रेकथ्रू सायन्स सोसायटीने एक पत्रक प्रसिद्ध केले असून अभ्यासक्रमातून उत्क्रांतीचा सिद्धांत वगळल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. या पत्रकावर ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’, ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च’, ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ यासारख्या वैज्ञानिक संस्थांमधील प्रतिनिधींनी स्वाक्षरी केली आहे.

charles darwin
charles darwinsakal

संकल्पना स्पष्ट होणार नाहीत

‘एनसीईआर’टीने दहावीच्या विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकातील ‘आनुवांशिकता आणि उत्क्रांती’ हे नववे प्रकरण वगळून त्याच्या जागी केवळ आनुवांशिकता ठेवले आहे. मात्र याला शास्त्रज्ञांनी विरोध दर्शविला आहे. विद्यार्थ्यांना मूलभूत वैज्ञानिक शोधाच्या संपर्कापासून दूर ठेवण्याचा हा प्रकार असून यामुळे विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या संकल्पना स्पष्टपणे कळणार नाहीत, असे मत शास्त्रज्ञांनी मांडले आहे.

वैज्ञानिक पद्धतीचे महत्त्व...

वैज्ञानिक स्वभाव आणि तर्कसंगत जागतिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी उत्क्रांती प्रक्रिया महत्त्वपूर्ण आहे. डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत विद्यार्थ्यांना गंभीर विचार आणि वैज्ञानिक पद्धतीचे महत्त्व शिकवतो. जैविक जग सतत बदलत आहे, ही वस्तुस्थिती असली तरी मानवाची उत्क्रांती वानराच्या काही प्रजातींपासून झाली आहे हे डार्विनने त्याच्या सिद्धांतात मांडले असून त्याला तर्कसंगत विचारांचा आधार आहे. त्यामुळे हा भाग अभ्यासक्रमातून वगळणे चुकीचे असल्याचे ‘ब्रेकथ्रू सायन्स सोसायटी’ने आपल्या पत्रकात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.