मुंबई लोकलमध्ये तरुणीवर ब्लेडने हल्ला; चर्नी रोड स्टेशनवरील घटना

mumbai local
mumbai local
Updated on
Summary

चर्नी रोड रेल्वे स्टेशनवर महिलांच्या डब्यात घुसून तरुणीवर ब्लेडने हल्ला केल्याची घटना घडली आहे.

मुंबई - चर्नी रोड रेल्वे स्टेशनवर तरुणीवर ब्लेडने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेने स्टेशनवर मोठी खळबळ उडाली आहे. चर्नी रोड स्टेशनवर महिला डब्यात घुसून हा हल्ला केल्याचं समजत आहे. रेल्वे डब्यात सुरक्षा रक्षक नसल्याची माहितीसुद्धा मिळत आहे.

तरुणीवर ब्लेडने हल्ला झाल्यानंतर या प्रकरणी लोहमार्ग पोलिस गुन्हा दाखल करून घेत आहेत. ही घटना शुक्रवारी रात्री १२ च्या सुमारास घडली असून सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली आहे. आरोपीने महिलांच्या डब्यात घुसून हल्ला केल्यानं महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा उपस्थित झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()