जामिनावर सुटका; प्रेम मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक
गोरेगाव - प्रेमात वियोग आलेल्याना पुन्हा एकत्रित करून देण्याचा दावा करणाऱ्या तसेच प्रेम मिळवून देण्याचा दावा करणाऱ्या कथित लव्ह गुरूला वनराई पोलिसांनी अटक केली होती. पोलिसांत आलेल्या विविध तक्रारींवरून पोलिसांनी कारवाई करीत राजस्थान गाठून या लव्ह गुरूला तुरुगांत डांबले. दरम्यान, नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार त्यास आज जामीन मंजूर झाल्याने तो बाहेर आला आहे.
जोगेश्वरी येथील एका २२ वर्षे युवतीने पोलिसांना लव्ह गुरू असलेल्या निखिल कुमार सुरेश कुमार भार्गव याच्याविरुद्ध तक्रार दिली होती. तरुणीचे आपल्याच कार्यालयातील एका तरुणासोबतचे संबंध काही दिवसांपासून बिघडले होते. त्यामुळे तरुण तिला बोलायलाही नकार देत होता. हे संबंध सुरळीत व्हावेत, अशी तरुणीची इच्छा होती.
अशातच तिला मोबाईलवर एक संदेश आला. त्यात सदर लव्ह गुरूने तुझी समस्या सोडवतो, असे आश्वासन तरुणीला दिले. त्याबदल्यात राजस्थानच्या सिकरमधील ‘आयसीआयसीआय’च्या एका बॅंक खात्याचा नंबर देऊन त्यात १० हजार रुपये जमा करण्यास सांगितले. नंतर हळूहळू पूजापाठ व हवनच्या नावाखाली आरोपीने तरुणीकडून एक लाख रुपये उकळले. तरुणीच्या भावाला हा प्रकार समजताच त्याने जोगेश्वरी पोलिस ठाणे गाठत तक्रार नोंदवली. तक्रार नोंदवून घेत पोलिसांनी दोघांनाही गोरेगावच्या वनराई पोलिस ठाण्यात पाठविले. पोलिसांनी चौकशी करून राजस्थानमधून २२ जानेवारी रोजी आरोपीला ताब्यात घेतले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.