Chhagan Bhujbal: सगेसोयरेंच्या हरकतींचं काय झालं? सरसकट दाखले दिल्यास...; ओबीसी शिष्टमंडळाच्या बैठकीत भुजबळ आक्रमक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह इथं ओबीसी शिष्टमंडळाची बैठक सुरु आहे.
Chhagan Bhujbal  Eknath Shinde Shiv Sena
Chhagan Bhujbal Eknath Shinde Shiv Sena Esakal
Updated on

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह इथं ओबीसी शिष्टमंडळाची बैठक सुरु आहे. या बैठकीत ओबीसी नेते छगन भुजबळ आक्रमक झाले आहेत.

सगेसोयरे या विषयावर हरकती नोंदवण्यात आल्या होत्या त्यावर सरकारनं काय कारवाई केली? असा सवाल विचारत सरसकट दाखले दिल्यास ओबीसींवर अन्याय होईल, अशी भूमिका त्यांनी मांडली. (Chhagan Bhujbal aggressive in meeting of OBC delegation meeting with CM DCMs over sage soyare issue in Maharashtra)

Chhagan Bhujbal  Eknath Shinde Shiv Sena
Arvind Kejriwal Bail Stay: केजरीवालांच्या जामिनाला स्थगिती! हायकोर्टानं निर्णय ठेवला राखून

वडगोद्री इथं ओबीसी नेते लक्ष्मण हाके आपल्या सहकाऱ्यांसह उपोषणाला बसले आहेत. या उपोषणकर्त्यांची सकाळी सरकारच्या प्रतिनिधींनी भेट घेतली. त्यानंतर हाके यांनी आपल्या मागण्या मान्य झाल्याचं सरकारनं लेखी लिहून द्यावं अशी अट घातली. त्यानंतर पाच जणांचं एक ओबीसी नेत्यांचं शिष्टमंडळ मुंबईला सरकारशी चर्चा करण्यासाठी रवाना झालं. यामध्ये धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, अतुल सावे, छगन भुजबळ आणि प्रकाश शेंडगे यांचा समावेश होता. या सर्वांसोबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली.

Chhagan Bhujbal  Eknath Shinde Shiv Sena
Maharashtra Police AI: महाराष्ट्र पोलीस बनणार देशात अत्याधुनिक; AI चा वापराबाबत फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती

दरम्यान, या बैठकीत छगन भुजबळ यांनी काही मुद्दे उपस्थित केले तसेच सरकारला त्यावरुन सवाल करत काही मुद्यांवर कारवाई करण्याची विनंती केली. भुजबळ म्हणाले, "मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले दिल्यास सगळे मराठा हे कुणबी होतील आणि जर सगळे मराठा कुणबी झाल्यास ओबीसींवर अन्याय होईल"

Chhagan Bhujbal  Eknath Shinde Shiv Sena
Lakshman Hake: "...तर ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागतोय की नाही याचा विचार करु"; लक्ष्मण हाके असं का म्हणाले?

भुजबळांनी उपस्थित केलेले मुद्दे

खोटी वंशावळ दाखवून कुणबी जातीचे दाखले दिले जात आहेत, त्यावर कारवाई करावी.

सगे सोयरे या विषयावर ८ लाखांहून अधिक हरकती आल्या त्यावर सरकारनं काय केलं?

सगे सोयरेंच्या व्याख्येवर सरकारला पुन्हा विचार करावा लागेल

मराठ्यांना आरक्षण देण्यास विरोध नाही, मात्र दुसऱ्यांवर अन्याय नको

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.