मुंबई : लोकसभा निवडणुकीत महायुतीची मोठी पिछेहाट झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे नाराज असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. खुद्द भुजबळांनी आपली नाराजी व्यक्त करताना आपल्याला अपमानास्पद वागणूक मिळाल्याचं म्हटलं होतं. यानंतर आता छगन भुजबळ हे पुन्हा ठाकरेंसोबत जाणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. या चर्चेवर आता खासदार संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. (Chhagan Bhujbal may enter Shivena UBT Sanjay Raut clearly explained what exactly going on)
संजय राऊत म्हणाले, कालपासून या जोरात अफवा चालेल्या आहेत की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे एक प्रमुख नेते छगन भुजबळ हे शिवसेनेच्या वाटेवर आहेत. आता हे कोणत्या वाटेनं येताहेत ही वाट काही आम्हाला दिसलेली नाही. छगन भुजबळ हे ऐकेकाळी शिवसेनेत होते त्याला एक जमाना झाला. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले आणि त्यानंतर बराच काळ शरद पवारांसोबत राष्ट्रवादीसोबत राहिले. त्यानंतर आता ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आहेत. असा त्यांचा बराच मोठा राजकीय प्रवास राहिलेला आहे.
त्यानंतर राजकीय प्रवासात शिवसेना बरीच पुढे गेलेली आहे महाराष्ट्रात आपण जे म्हणता त्या बातमीत आणि अफवेत कुठलंही तथ्य नाही. छगन भुजबळांनी शिवसेनेचा कुठलाही राजकीय संवाद झालेला नाही, होण्याची शक्यताही नाही. कारण त्यांनी आता स्वतःचा एक मार्ग निवडलेला आहे. त्यांच्या काही भूमिका आहेत त्यांच्या भूमिकांशी शिवसेनेचा मेळ लागणार नाही.
त्यामुळं छगन भुजबळ हे शिवसेनेत येणार अशा प्रकारच्या बातम्या पेरुन अफवा पसरवून महाराष्ट्रात राजकीयदृष्ट्या गोंधळ उडवायचा याला आम्ही महत्व देत नाही. छनग भुजबळांना शिवसेनेचा कुठलाही नेता भेटलेला नाही, भेटणार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.