महाविकास आघाडीच्या प्रस्तावावर फडणवीसांची 'ऑफर', थेट दिल्लीला फोन

Devendra Fadnavis News | Rajya Sabha Election News
Devendra Fadnavis News | Rajya Sabha Election NewsSakal
Updated on

राज्यसभा निवडणुकीच्या दृष्टीने आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. राज्यसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आजची शेवटची मुदत आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची वेळ आहे. त्याआधीच मुंबईत खलबतं सुरू झाली आहेत. (Chhagan Bhujbal Meets Devendra Fadnavis)

महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेलं आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात हे शिष्टमंडळ फडणवीसांच्या सागर या बंगल्यावर दाखल झालं. या भेटीमध्ये राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीचा असल्याचं भुजबळांनी स्पष्ट केलं. मात्र माध्यमांसमोर आल्यानंतर त्यांनी बैठकीत चर्चेला आलेल्या प्रस्तावाची माहिती दिली. या प्रस्तावावर फडणवीसांनी उलटा गेम करत मोठी ऑफर दिली आहे. यासाठी त्यांनी थेट दिल्लीला पक्षश्रेष्ठींना फोन फिरवला. (Rajyasabha Election 2022)

Devendra Fadnavis News | Rajya Sabha Election News
राज्यसभेसाठी मविआची खेळी; बिनविरोध निवडणुकीसाठी फडणवीसांना भेटणार

फडणवीस यांच्यासोबत भाजपचे काही नेते या बैठकीला उपस्थित होते. सध्या राज्यातील सहा जागांपैकी पाच जागांवरील उमेदवार अंतिम टप्प्यात आहेत. एका जागेवरून मोठा घोडेबाजार होऊ शकतो. या जागेवर शिवसेनेतर्फे संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपने कोल्हापुरातून धनंजय महाडिकांना उतरवलंय. कोणीही माघार घेण्यास तयार नसल्याने अपक्षांवर दिल्लीचं गणित अवलंबून आहे. यातच मविआतर्फे फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना ऑफर देण्यात आली. मात्र, फडणवीसांनी हीच 'गेम' मविआच्या नेत्यांवर उटवली आहे.

या वर्षी राज्यातील विधानपरिषदेवरील दहा आमदारांचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे नव्याने सदस्य पाठवण्यासाठी पक्षश्रेष्ठींचे उंबरे झिजवायला सुरुवात झाली आहे. दरम्यान भुजबळ यांनी याच संबंधी फडणवीसांना ऑफऱ दिली. राज्यसभेची निवडणूक बिनविरोध केल्यास विधानपरिषदेसाठी एक जागा आम्ही तुम्हाला वाढवून देऊ, असं भुजबळ म्हणाले. त्यासाठी तुम्हाला मदत करू. यामुळे ती निवडणूकही बिनविरोध होईल, असं ते म्हणाले.

शेवटच्या जागेसाठी गोळाबेरीज करण्यासाठी आमच्याकडे जास्त जागा आहेत. आम्हाला संधी द्या. तुम्ही माघार घ्यावी. त्याची भरपाई पुढच्या वेळी विधान परिषदेसाठी करू, असं भुजबळ म्हणाले.

फडणवीसांनी उलटवली 'गेम'

महाविकास आघाडीची ऑफर ऐकताच फडणवीसांनी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. यासाठी चर्चा करण्याची गरज असल्याचं म्हटलं. मात्र हीच ऑफर आम्ही तुम्हाला देतो. तुम्ही विचार करा, असं फडणवीस म्हणाले. आणि त्यांनी ऑफऱ वर आणखी एक ऑफऱ देत गेम उटलवला.

यावर स्पष्टीकरण देताना, आमची दिल्लीत माणसंचं कमी असल्याचं भुजबळ म्हणाले. तुमची लोकसभेत माणसं जास्त आहेत. राज्यसभेतही संख्या मोठी आहे. त्यामुळे आम्हाला राज्यसभेची संधी द्यावी, अशी मागणी भुजबळांनी केली.

आता देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी दिल्लीता फोन फिरवला आहे. दिल्लीतून निरोप येताच पुढच्या दीड तासात दोन्ही पक्षांची पुन्हा बैठक होणार आहे. महाविकास आघाडीचे नेते देखील भुजबळ यांच्या बंगल्यावर चर्चेसाठी दाखल झाले आहेत.

आम्ही सुद्धा आमच्या नेत्यांना सांगू. तीन वाजेपर्यंत वेळ आहे. एक दीड तासाने पुन्हा बैठक होईल, असं भुजबळ माध्यमांना म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.