Chhagan Bhujbal: महायुतीत मीठाचा खडा; भुजबळांकडून नांदगाववर दावा, दादा भूसे म्हणाले आम्ही येवल्यातून लढू!

Nashik Politics: पालकमंत्री दादा भुसे यांनी उत्तर देताना येवला मतदारसंघावर शिवसेनेने दावा केला, तर उचित होईल का, असा सवाल केला.
Chhagan Bhujbal: महायुतीत मीठाचा खडा; भुजबळांकडून नांदगाववर दावा, दादा भूसे म्हणाले आम्ही येवल्यातून लढू!
Updated on

आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी, असा सामना रंगणार आहे. युती व आघाडीमधील अंतर्गत पक्षांमध्ये कुरबुरी सुरू आहेत. त्याचा प्रत्यय बुधवारी (ता. ९) नाशिकमध्ये दिसला.

अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी समाजमाध्यमांवर माजी खासदार समीर भुजबळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना, ‘नांदगाव-मनमाड मतदारसंघाला आणखी पुढे घेऊन जा’, अशी पोस्ट केली. त्यावर नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी उत्तर देताना येवला मतदारसंघावर शिवसेनेने दावा केला, तर उचित होईल का, असा सवाल केला.

Chhagan Bhujbal: महायुतीत मीठाचा खडा; भुजबळांकडून नांदगाववर दावा, दादा भूसे म्हणाले आम्ही येवल्यातून लढू!
Chhagan Bhujbal : फुलेंचा पुतळा विचारांच्या मजबूत पायावर उभा; लोकार्पण सोहळ्यात भुजबळांकडून विचारसरणीवर ठाम असल्याचा निर्धार

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर महाविकास आघाडी व महायुतीमधील घटक पक्षांमध्ये जागावाटपाचे सूत्र निश्चित करताना एकमेकांच्या जागांवर दावे-प्रतिदावे केले जात आहेत. माजी खासदार समीर भुजबळ यांचा वाढदिवस बुधवारी नांदगाव-मनमाड विधानसभा मतदारसंघात साजरा झाला.

कार्यक्रमाच्या माध्यमातून समीर पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीत उभे राहणार असल्याचे स्पष्ट होते. वाढदिवसानिमित्त छगन भुजबळ यांनी समाज माध्यमांवर समीर भुजबळ यांना शुभेच्छा देताना, त्यांच्या आतापर्यंतच्या कामाचा गौरव केला. पुढील काळातही समीर ताकदीने काम करत जनतेने दिलेली जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडतील, असा विश्वास व्यक्त केला.

नांदगाव-मनमाड मतदारसंघाला आणखी पुढे घेऊन जाण्यासाठी तुला उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य लाभो, अशा शुभेच्छा दिल्या. भुजबळ यांच्या शुभेच्छांनी शिवसेनेच्या नेत्यांचा तीळपापड झाला. शासकीय महाविद्यालयाच्या उद्‌घाटनानिमित्त पालकमंत्री दादा भुसे यांनी भुजबळ यांच्या शुभेच्छांना त्यांच्याच पद्धतीने उत्तर दिले.

Chhagan Bhujbal: महायुतीत मीठाचा खडा; भुजबळांकडून नांदगाववर दावा, दादा भूसे म्हणाले आम्ही येवल्यातून लढू!
Chhagan Bhujbal : विकासकामांसाठी कुणाचीही मदत घेणार : छगन भुजबळ

वातावरण पेटले

नांदगाव-मनमाड विधानसभा मतदारसंघामधून शिवसेनेचे सुहास कांदे आमदार आहेत. कांदे पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. या मतदारसंघातून पूर्वी पंकज भुजबळ निवडून आले होते. २०१९ च्या निवडणुकीत पंकज यांचा सुहास कांदे यांनी पराभव केला.

आता समीर नांदगाव मतदारसंघातून निवडणुकीसाठी इच्छुक असल्याने त्या दृष्टीने विविध कार्यक्रम घेत आहेत. मात्र, छगन भुजबळ यांच्या शुभेच्छामुळे महायुतीमधील वातावरण पेटले आहे. पालकमंत्री दादा भुसे यांनीही नांदगाववर दावा केला, तर शिवसेना येवल्यावर दावा करेल. आम्ही केलेला दावा उचित होणार का, असा सवाल उपस्थित करून भुजबळ यांना उत्तर दिले.

Chhagan Bhujbal: महायुतीत मीठाचा खडा; भुजबळांकडून नांदगाववर दावा, दादा भूसे म्हणाले आम्ही येवल्यातून लढू!
Manoj Jarange vs Chhagan Bhujbal: शांतता रॅली जरांगेंची, सुरक्षा वाढवली भुजबळांची | Maharashtra News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.