'रेमडिसिव्हिर'च्या वक्तव्यावरून दरेकरांनी घेतला भुजबळांचा समाचार

'रेमडिसिव्हिर'च्या वक्तव्यावरून दरेकरांनी घेतला भुजबळांचा समाचार
Updated on

मुंबई: कोरोनाचा राज्यातील कहर हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राज्यातील विविध ठिकाणी कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. लॉकडाउन लावूनही संसर्गाचे प्रमाणे अपेक्षेप्रमाणे कमी होताना दिसत नाहीये. राज्यातील अनेक ठिकाणी वैद्यकीय सेवांचा तुटवडा दिसून येतोय. कोरोनावर परिणामकारक ठरणाऱ्या रेमडिसिव्हिर औषधाचा तुटवडा ही सध्या राज्यातील जनतेसाठी आणि सरकारसाठी चिंतेची बाब आहे. काही ठिकाणी रेमडिसिव्हिरचा काळाबाजार सुरू असताना नाशिकमध्ये मात्र औषधासाठा अगदीच अपुरा असल्याचे चित्र आहे. या मुद्द्यावर राज्याचे मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी, 'रेमडिसिव्हिर घरी तयार होत नाही', असं वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्याचा राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी चांगलाच समाचार घेतला.

"छगन भुजबळ यांनी रेमडीसीवर आमच्या घरात तयार होत नाही असे म्हणणे म्हणजे सरकार या व्यवस्थेत हतबल असल्याचा एकाअर्थी पुरावाच आहे. अशा प्रकारची वक्तव्ये करणं म्हणजे सरकारने आपल्या कर्तव्यापासून आणि जबाबदारीपासून दूर जाणं असं होतं. छगन भुजबळ हे अतिशय ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यासारख्या जेष्ठ नेत्यांनी असे वक्तव्य करणं योग्य नाही. जेव्हा आपातकालीन स्थिती असते, तेव्हा राज्याची जनता घाबरलेली असते. त्या जनतेला समजावून सांगणं आणि त्यांच्या रोषाला शांतपणे सामोरं जाणं हे लोकप्रतिनिधीचं काम आहे. त्यामुळे भुजबळांच्या वक्तव्याचा मी निषेध करतो", अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला.

भुजबळ नक्की काय म्हणाले?

"सध्या तुटवडा आहे. माझ्या घरात तर औषध नाहीत. कलेक्टरच्या घरीदेखील औषधं नाहीत. जर कोणी मला सांगितलं की या दुकानात साठा करण्यात आलाय तर मी स्वत: जाइन आणि तो साठा गरजूंसाठी उपलब्ध करून देईन. सुरूवातीच्या काळात रेमडेसिव्हिरचा साठा उधळला गेला. त्यामुळे आता त्याचा तुटवडा आहे. त्याला कोण काय करणार? मी माझ्या घरी ते औषध बनवत नाही", असं विधान नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केला.

मुंबईत रेमडेसिव्हिरचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश 

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नुकताच रेमडिसिव्हिरचा काळाबाजार रोखण्यासाठी कठोर पावलं उचलण्याचा इशारा दिला. त्यानंतर शुक्रवारी खासगीत रेमडिसिव्हिर इंजेक्शन जास्त किमतीत विकणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखा 10 च्या पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणी काही जणांना पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून पोलिसांनी डझनभर इंजेक्शनचा साठा जप्त केला. हे इंजेक्शन आरोपींनी कुठून आणले, कुठे विकणार होते? याचा आता गुन्हे शाखेचे पोलिस शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.