Chhagan Bhujbal: "सरकार किंवा पक्षातून काढलं तरी ओबीसींसाठी लढत राहणार"; भुजबळांचं मोठं विधान

मराठा समाजाला ओबीसींतून आरक्षण देण्यावरुन भुजबळ आक्रमक झाले आहेत.
chhagan bhujbal
chhagan bhujbalesakal
Updated on

मुंबई : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्याविरोधात छगन भुजबळांनी सध्या आक्रमक पवित्रा घेतला आहे. आपल्याला सरकारमधून काढून टाकलं किंवा पक्षातून काढलं तरी आपण ओबीसींच्या बाजूचा लढा सुरुच ठेवणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. साम टीव्हीशी बोलताना त्यांनी आपली भूमिका मांडली. (Chhagan Bhujbal will continue to fight even if expelled from govt or party Bhujbal big statement)

chhagan bhujbal
Ram Temple Ayodhya Security: ATS कमांडोच्या सुरक्षेखाली अयोध्या! 360 डिग्री सुरक्षा कव्हरेजसाठी अँटी-माइन ड्रोन तैनात

भुजबळांना प्रश्न विचारण्यात आला की, जर आपल्या भूमिकेला पक्षातून आणि सरकारमधून पाठिंबा मिळाला नाही तर तुम्ही सरकारमधून आणि पक्षातून बाहेर पडणार का? यावर भुजबळांनी म्हटलं की, "हो पक्षानं मला काढावं माझी आमदारकी रद्द करावी अन् सरकारमधून काढावं पण मी माझं काम सोडणार नाही"

chhagan bhujbal
Pariksha Pe Charcha: "मुलांना इतरांची उदाहरणं देऊ नका"; PM मोदींनी 'परीक्षा पे चर्चा'मध्ये केलं पालकांना आवाहन

भुजबळांच्या या भूमिकेवर अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, पक्षाचे वरिष्ठ नेते यावर काय ते निर्णय घेतील. ते पुढे म्हणाले, "भुजबळ हे ओबीसींच्या प्रश्नावर ते गेल्या ३० वर्षापासून सातत्यानं भूमिका मांडत आले आहेत. मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे याबाबत त्यांच्या मनात किंतू परंतू नाही. (Latest Marathi News)

पण ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये अशी पक्षाचे अध्यक्ष अजित पवारांची आणि भुजबळांसह अनेक नेत्यांची तशी भावना आहे. वेळप्रसंग पडला तर काही किंमत मोजावी लागली तर त्यासाठी तयार आहे, ही त्यांची भावना आहे. पण ओबीसींच्या आरक्षणाबाबत त्यांची वैयक्तिक भूमिक आहे. उद्या पक्षाची नियमित बैठक देवगिरी बंगल्यावर पार पडणार आहे, त्यावेळी हा विषय चर्चेला येईल आणि वरिष्ठ नेते त्याबाबत निर्णय घेतील.

chhagan bhujbal
NCP MLA Disqualification: 'राष्ट्रवादी'च्या आमदारांचा फैसला लांबणीवर! सुप्रीम कोर्टाची मुदतवाढ, आता 'या' तारखेपर्यंत नार्वेकरांना द्यावा लागणार निर्णय

दरम्यान, अजित पवारांनी भुजबळांच्या भूमिकेवर भाष्य केलं आहे. त्यांनी म्हटलं की, "प्रत्येकाची वेगवेगळी मते असू शकतात. वेगळे विचार असू शकतात, प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. त्याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी भूमिका घेतली. (Latest Marathi News)

मराठा आरक्षणाबाबत त्यांनी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मी कोणालाही धक्का न लावता यातून मार्ग काढेन असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे. अशातच घरात दोन भाऊ असतात त्यांच्यामध्ये देखील अनेक मतभेद असतात. घरातील सदस्य एकत्रित बसतात आणि त्यामध्ये काही समज गैरसमज असतील ते दूर करतात, असं अजित पवार म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.