Dombivali News : महायुतीचे काळे कारनामे असलेले काळे फुगे दाखवीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केला निषेध

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या संदर्भात घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ कल्याणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केले निषेध आंदोलन.
dombivali mahayuti protest by ncp sharad pawar party
dombivali mahayuti protest by ncp sharad pawar partysakal
Updated on

डोंबिवली - मालवण येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली. या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी कल्याण येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.

यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी राजीनामा देऊन अवघ्या महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी व मुख्यमंत्री यांनी त्यांची सर्वस्वी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा. तसेच निकृष्ट काम केलेल्या कंत्राटदाराला काळ्या यादीत समाविष्ट करावे अशी मागणी करण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.