Shivaji Maharaj Statue Collapse: सरकारने किमान शिवरायांना तरी सोडायचं होतं... राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला यांचा गंभीर आरोप!

Sharmila Thackeray Blames Government for Neglect, Calls for Immediate Action : शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कोसळण्याच्या घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेची माफी मागितली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही माफी मागितली.
Sharmila Thackeray Accuses Government of Corruption Over Shivaji Statue Collapse
Sharmila Thackeray Accuses Government of Corruption Over Shivaji Statue Collapseesakal
Updated on

महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असताना, शिवरायांच्या पुतळ्याच्या कोसळण्याच्या घटनेने राज्यातील राजकारण तापले आहे. राजकोट किल्ल्यावर उभारलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला होता. मात्र, पुतळा कोसळल्याने सत्ताधारी सरकार बॅकफूटवर आले असून, विरोधकांनी जोरदार टीका केली आहे.

शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कोसळण्याच्या घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेची माफी मागितली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही माफी मागितली, परंतु या माफीमागणीमुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप लावले आहेत.

शर्मिला ठाकरे यांचा भ्रष्टाचाराचा आरोप-

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी या प्रकरणात सत्ताधारी सरकारवर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला आहे. "सगळीकडे रस्त्यांवर खड्डे आहेत, भ्रष्टाचार मोकळलाय. महाराजांच्या पुतळ्यापर्यंत तो पोहोचला आहे, हे अत्यंत दुर्दैव आहे," असे त्यांनी म्हटले आहे. "सरकारने किमान छत्रपती शिवाजी महाराजांना तरी सोडायचं होतं," असे त्यांनी आपल्या वक्तव्यात नमूद केले.

"शक्ती कायदा लवकरात लवकर लागू करावा" - शर्मिला ठाकरे

शर्मिला ठाकरे यांनी बदलापूर अत्याचार प्रकरणात देखील संताप व्यक्त केला. त्यांनी म्हटले आहे की, "जोपर्यंत शक्ती कायदा अस्तित्वात येत नाही आणि त्याचं अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत अशा घटना घडत राहणार." त्यांनी पंतप्रधानांना निवेदन देण्याचा संकल्प केला असून, "लवकरात लवकर शक्ती कायदा पास करून घ्यावा," अशी मागणी त्यांनी केली आहे.

Sharmila Thackeray Accuses Government of Corruption Over Shivaji Statue Collapse
Israel-Gaza war: 11 महिन्यांपासून सुरु असलेलं युद्ध १० महिन्यांच्या मुलामुळे थांबलं! 3 दिवस राहणार शांतता, जाणून घ्या कारण

महाविकास आघाडीचे "जोड़े मारो" आंदोलन

शिवरायांच्या पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर महाविकास आघाडी (मविआ)ने सरकारविरोधात "जोड़े मारो" आंदोलन करण्याचे ठरवले आहे. हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडिया या मार्गावर हे आंदोलन होणार आहे, परंतु पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. मविआ आपल्या आंदोलनावर ठाम असल्याने हुतात्मा चौक परिसरात मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

Sharmila Thackeray Accuses Government of Corruption Over Shivaji Statue Collapse
Eknath Shinde : आमचे सरकार हप्ते देते; घेत नाही, मुख्यमंत्री शिंदे , ताकद वाढेल तशी ओवाळणीची रक्कम वाढवू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.