डोंबिवली - इतिहास खूप मोठा आहे, दुर्गाडी किल्ल्याचा विकास व्हावा अशी अपेक्षा होती पण झाला नाही. केंद्रात भाजपचे सरकार आहे. गेले पाच वर्षे इथे जे आमदार आहेत त्यांनी सुरत गुवाहाटी गाठली. कारण सांगितली, हिंदुत्व आणि विकासासाठी गेलो..राष्ट्रवादीचे अर्थमंत्री आम्हाला निधीच देत नाहीत म्हणून गेलो. आता तेच राष्ट्रवादीच्या अर्थमंत्र्यांबरोबर मांडीला मांडी लावून सत्ता उपभोगत आहेत असा घणाघात शिवसेना उपनेते आणि इतिहास अभ्यासक प्रा. नितीन बानुगडे - पाटील यांनी शिवसेना शिंदे गटावर केला..कल्याण पश्चिम येथील महाविकास आघाडीचे उमेदवार सचिन बासरे यांच्या प्रचार सभेचे शंकरराव चौक येथे आयोजन मंगळवारी करण्यात आले होते. यासभेला प्रा. नितीन बानुगडे - पाटील हे उपस्थित होते.यावेळी भिवंडीचे खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे, उमेदवार सचिन बासरे, उपनेते अल्ताफ भाई शेख, अल्पेश भोईर, रवींद्र कपोते, राष्ट्रवादी काँग्रेसचे महेश तपासे, काँग्रेसच्या कांचन कुलकर्णी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी दुर्गाडी किल्ल्याचा इतिहास, विकास आणि महाराष्ट्रातील सामाजिक प्रश्नांवर भाष्य करत त्यांनी विद्यमान सरकारवर निष्ठेच्या मुद्द्यावर घणाघात केला..कल्याणच्या ऐतिहासिक वारशाचा ठेवा सांगताना इतिहास अभ्यासक प्रा. बानुगडे-पाटील यांनी केंद्र सरकारवर टीका केली. केंद्रात भाजपचे सरकार असून देखील कल्याणचा विकास झालेला नाही. जे आमदार गेल्या पाच वर्षांपासून हिंदुत्व आणि विकासाच्या नावाखाली सुरत व गुवाहाटी गाठत होते, त्यांनीच आता राष्ट्रवादीच्या अर्थमंत्र्यांबरोबर मांडीला मांडी लावून सत्ता उपभोगली आहे..कल्याणच्या रुग्णालयांची अवस्था सांगताना ते म्हणाले, डॉ. आनंदी बाई जोशीचा वारसा मिरवणाऱ्या कल्याण शहरात रुग्णालय आजारी आहेत. परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग खडतर असतो हे माहीत होतं पण कल्याणमध्ये जाण्यासाठीची परिस्थिती देखील खडतर असल्याचे त्यांनी नमूद केले.महाराष्ट्रातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांवर बोलताना त्यांनी सरकारच्या शक्ती विधेयकाच्या अंमलबजावणीवरही नाराजी व्यक्त केली. शिवसेना उपनेते प्रा. बानुगडे-पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा संदर्भ देत भ्रष्टाचारावर हल्लाबोल केला..सिंधुदुर्ग किल्ल्यातील दगडांच्या चिरांना निष्ठा आहे; ती कधीच झीजणार नाही. हीच निष्ठा घेऊन सचिन बासरे उभे आहेत. ही लढाई गद्दार विरुद्ध निष्ठावंतांची आहे. पुतळा वाऱ्याने नव्हे, तर भ्रष्टाचाराने पोखरलेल्या व्यवस्थेने कोसळला आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमान ढासळला आहे. इथली नैतिक मूल्य ढासाळली आहेत असे सांगत त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला.#ElectionWithSakal.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.