Jaya Shetty Murder Case: जया शेट्टी हत्याप्रकरणात छोटा राजन दोषी,  दुसऱ्यांदा मिळाली जन्मठेपेची शिक्षा

Jaya Shetty Murder Case: राजनची ही जन्मठेपेची दुसरी शिक्षा आहे. न्यायालयाने स्पष्ट सांगितले. जया शेट्टी यांची हत्या छोटा राजन गँगने केली.
Chhota Rajan convicted in Jaya Shetty murder case
Chhota Rajan convicted in Jaya Shetty murder caseesakal
Updated on

Jaya Shetty Murder Case: 

हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी हत्याप्रकरणात छोटा राजन दोषी आढळला असून त्याला दुसऱ्यांदा जन्मठेपेची शिक्षा मिळाली आहे. विशेष सीबीआय कोर्टाने हा निकाल दिला आहे. पत्रकार जे डे हत्याकांडानंतर छोटा राजनला दुसरी जन्मठेप मिळाली आहे.

रवी पुजारी मार्फत जया शेट्टी राजन गँगने ५० कोटीची खंडनी मागितली होती. खंडनी देण्यास नकार दिल्याने २००१ मध्ये ग्रँड रोडमधल्या एका हॉटेलमध्ये राजनच्या हस्तकांनी गोळ्या झाडून जया शेट्टी यांची हत्या केली होती.

राजनची ही जन्मठेपेची दुसरी शिक्षा आहे. न्यायालयाने स्पष्ट सांगितले. जया शेट्टी यांची हत्या छोटा राजन गँगने केली. यामध्ये ३०२, १२० ब अंतर्गत जन्मठेप आणि १ लाखाचा दंड, अशी शिक्षा राजनला देण्यात आली. 

Chhota Rajan convicted in Jaya Shetty murder case
Palghar Railway Accident : अखेर २६ तासांनी विरारकडे सुटली पहिली लोकलं, रेल्वेच्या प्रयत्नांना आले यश

जया शेट्टी या मध्य मुंबईतील गमदेवी येथील गोल्डन क्राउन हॉटेलच्या मालक होत्या. छोटा राजन टोळीकडून शेट्टीला खंडणीच्या धमक्या येत होत्या. ४ मे २००१ रोजी हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर टोळीच्या दोन कथित सदस्यांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली होती.

छोटा राजन टोळीकडून खंडणीच्या धमक्या मिळाल्याची तक्रार केल्यानंतर हॉटेलचालकाला पोलिस संरक्षण देण्यात आले. मात्र, हल्ल्याच्या दोन महिन्यांपूर्वी त्यांच्या विनंतीवरून त्यांची सुरक्षा काढून घेण्यात आली होती.

Chhota Rajan convicted in Jaya Shetty murder case
'बेकायदा पब-हुक्का पार्लरला स्थानिक पोलीसच जबाबदार'; आमदार केळकरांची पोलीस आयुक्तांशी काय झाली चर्चा?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.