Latest Mumbai News: नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणूक प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली आहे.यावेळी त्यांनी कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. याच बरोबर पीडितांना न्याय मिळवून देण्याची खात्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
मिळालेल्या माहीतीनुसार, मुख्यमंत्र्यांनी बीएमसी आयुक्त श्री. भूषण गगराणी यांना रुग्णालयाच्या डीनची तात्काळ बदली करण्याचे निर्देश दिले आहेत.याच बरोबर तर रुग्णालयातील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अतिरिक्त उपाययोजना राबवण्याबाबत सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.