Ekanth Shinde: भाजपकडून मुख्यमंत्र्यांचं खच्चीकरण सुरु आहे का? जाणून घ्या इनसाईड स्टोरी

भारतीय जनता पक्ष शिंदेंच्या शिवसेनेविरोधात एकवटली असल्याचे पाहायला मिळत आहे |It is seen that Bharatiya Janata Party is united against Shinde's Shiv Sena
ekanath shidne bjp thane
ekanath shidne bjp thanesakal
Updated on

Ekanth Shinde Thane Politics: गेल्या काही दिवसांपासून राज्य पातळीवर शिवसेना शिंदे गट आणि भाजपा यांच्यामध्ये सगळं व्यवस्थित सुरू आहे असं दिसून येत आहे. वेळोवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकमेकांच्या कामाविषयी स्तुतीसुमने उधळताना पाहायला मिळत आहेत. (thane Political news)

याचबरोबर केंद्रातील नेतेही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाविषयी खुश असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. असं जरी असलं तरी देखील एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यात मात्र भारतीय जनता पक्ष शिंदेंच्या शिवसेनेविरोधात एकवटली असल्याचे पाहायला मिळत आहे.(ekanth shidne vs bjp in thane)

ekanath shidne bjp thane
Ekanth Shinde: शिवसेना शिंदे गटातर्फे महाआरोग्य शिबिर!

यातच ठाणे आणि कल्याण या दोन मतदारसंघात तर एकमेकांविरोधातील सुप्त संघर्ष काही लपून राहिलेला नाही. नुकतेच कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये गोळ्या झाडून हल्ला केला. या गोष्टीची चर्चा संपूर्ण राज्यात झाली. यावेळी आमदार गणपत गायकवाड यांनी थेट आरोप केले ते एकनाथ शिंदे यांच्यावरच.(eknath shinde kalyan)

ठाणे शिवसेनेचा बालेकिल्ला

2014 साली आणि 2019 साली कल्याण आणि ठाणे हे दोन्हीही मतदारसंघ शिवसेनेलाच देण्यात आले होते. ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला आणि या ठिकाणी भाजप कधीही ढवळाढवळ करत नाही असे चित्र आजवर पाहिला मिळाले होते. मात्र आता चित्र जरासे बदललेले पाहायला मिळत आहे.

गेल्या दीड वर्षांपासून आमदार गणपत गायकवाड हे एकनाथ शिंदे व त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्यावर वेळोवेळी आरोप प्रत्यारोप करत असल्याचे पाहायला मिळत होते. यामुळे कल्याणची जागा ही भाजपला हवी आहे असेच चित्र पाहायला मिळत होते.(shrikant shidne maharashtra)

ekanath shidne bjp thane
Ekanth Shinde: मुख्यमंत्र्यांचे सरकारी वर्षा निवासस्थान गुन्हेगारांसाठी पर्यटनस्थळ झाले आहे का ?

मात्र राज्यात एकत्रित सत्तेत असल्यामुळे भाजपचे कोणतेही वरिष्ठ नेते या विषयी बोलत नव्हते. प्रसार माध्यमांमध्ये आणि स्थानिक राजकीय वर्तुळामध्ये जरी श्रीकांत शिंदे यांना होणाऱ्या विरोधाची चर्चा झाली तरी देखील कोणत्याही बड्या नेत्यामुळे कडून या भाजपच्या भूमिकेला दुजोरा देण्यात आला नाही आणि तो अजूनही दिला जात नाहीये.

असं जरी असलं तरी, एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गट या दोघांमध्ये काही सख्य असल्याचे पाहिला मिळत नाही. वेळोवेळी दबाव तंत्राचा राजकारण यावेळी भाजप आणि शिवसेनेतर्फे करण्यात येते. कल्याणमध्ये ज्या प्रकारे वाद झाला त्या प्रकारचा वाद जरी ठाण्यामध्ये झाला नसला तरी देखील ठाण्यामधूनही तिथली लोकसभेची जागा ही भाजप लढवण्यासाठी उत्सुक आहे.

नाईक कुटुंब

यामध्ये प्रामुख्याने नाव घ्यायची तर दोन ते तीन नावं समोर येतात. ज्यामध्ये प्रामुख्यानं गणेश नाईक व त्यांचे कुटुंब आघाडीवर आहे. आधी शिवसेना मग राष्ट्रवादी आणि आता भाजप अशा प्रकारे नेहेमीच सत्तेत राहून नाईक कुटुंबाने स्वतःचा एक दबदबा निर्माण केला आहे. एकेकाळी गणेश नाईक हे ठाण्याचे पालकमंत्री होते मात्र 2014 नंतर त्यांच्या या वर्चस्वाला सुरुंग लागला.(ganesh naik family history)

ekanath shidne bjp thane
Ajit Pawar Vs Ekanth Shinde : तुमच्या ठाण्यात एवढे मृत्यू कसे ? अजित पवारांचा थेट CM शिंदेंना सवाल

गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये सलोख्याचे संबंध नाहीत हे संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वश्रुत आहे. यामुळे ठाण्यातून एकनाथ शिंदेंना नाईक कुटुंबातून संजीव नाईक हे आव्हान देतील अशी चर्चा आहे. याचबरोबर कट्टर संघ विचारी असलेले आणि ज्यांची केंद्रातील बड्या नेत्यांची जवळीक आहे. असे म्हटले जाणारे विनय सहस्रबुद्धे यांना देखील ठाण्यातून उमेदवारी मिळू शकते अशी चर्चा आहे.(navi mumbai politics)

बालेकिल्ला शिंदे राखणार?

सरते शेवटी, एकनाथ शिंदे यांच्या विरोधात ठाणे जिल्ह्यात भाजप सक्रिय झाली असुन एकनाथ शिंदे यांना आपल्याच बालेकिल्ल्यात भाजपशी तह करावा लागणार का? एकनाथ शिंदे यांची कोंडी करुन ठाण्याची जागा भाजप स्वत:कडे घेणार का? शिंदे विरुद्ध भाजप या लढाईची रणभूमी ही ठाणे जिल्हाच असणार का? आणि यावेळी आपला बाले किल्ला शिंदे राखणार का? हे पाहणं अतिशय उत्सुकतेच ठरणार आहे.(eknath shidne vs bjp)

ekanath shidne bjp thane
Ekanth Shinde: जो निर्णय कधीही घेतला नाही, तो आमच्या सरकारने घेतला; शिंदेंचा दावा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()