मुंबईतील वाढते प्रदूषण, मुंबईतील स्वच्छता याबाबत मुंबई महानगर पालिकेकडून काय उपाययोजना करण्यात आली आहे. याची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री आज पहाटे ५ वाजल्यापासून मुंबईत विविध ठिकाणी भेट देत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या घराजवळूनच पाहणीला सुरूवात केली. यावेळी त्यांच्यासोबत मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल देखील होते.
मुंबई शहरातील हवेची गुणवत्ता गेल्या काही दिवसांमध्ये खालवल्याचे दिसून आले. मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावल्यामुळे उच्च न्यायालायाने देखील राज्य सरकारला चांगलेच फटकारले होते. त्यानंतर मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी बैठका घेण्यात आल्या. त्यानंतर आता विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यात मुंबई शहरातील रस्ते पाण्याने धुवून हवेतील प्रदूषण कमी करण्याचे काम सुरु झाले आहे. या कामाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहाटेच वाजताच रस्त्यावर उतरले. यावेळी पाहणी करताना त्यांनी नागरिकांशी संवाद साधला.
दरम्यान यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, प्रदूषणाचं प्रमाण वाढलं होतं. मी पालिका कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. रस्ते पाण्याने धुवावेत, डस्ट पूर्ण काढावी हवेतील धुलीकन फॉगरने कमी करावेत. सक्शन मशीन आपण लावलेली आहे. १ हजार टॅकर भाड्याने घेऊन रस्ते व फुटपाथ पाण्याने धुतले जात आहेत. तर प्रदूषणाचं प्रमाण कमी होईल यासाठी संपुर्ण प्रयत्न सुरू असल्याचे देखील यावेळी शिंदे म्हणालेत.
मुंबईत मोठ्या प्रमाणावर कामे सुरु आहेत. प्रदूषणावर नियंत्रण करण्याचे काम केलं जात आहे. गरज भासल्यास कृत्रिम पाऊस पाडणार आहे. त्यासाठी दुबई येथील एका कंपनीशी करार करण्यात येणार आहे. हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. त्यासाठी झाडे लावण्यात येणार आहेत. अर्बन फॉरेस्ट ही संकल्पना देखील यावेळी शिंदे यांनी मांडली आहे.
एक दिवसाआड मुंबईतील रस्ते पाण्याने धुतले तर प्रदूषणावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवले जाईल. कचराही रोज उचलला जात आहे. स्वच्छतेवर आम्ही खूप भर दिला आहे. रस्ते, फुटपाथ आणि नाल्यांची स्वच्छता करण्याचे आदेश दिले आहेत. संपूर्ण बीच स्वच्छता करण्यासाठी एक टीम लावण्यात येणार आहे. सार्वजनिक शौचालय दिवसातून चार ते पाच वेळा स्वच्छ केले जाईल, अशी माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
तर बांधकाम सुरू असलेल्या इमारतींनाही नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. महत्वाच्या नाकयावर फॉगर मशीन लावल्या जातील. दुबई बेस कंपनीशी करारनामा करून हवेतील प्रदूषणकमी करण्यासाठी यंत्रणा उभी केली जाईल. गार्डनमध्ये झाडांची मोठ्या प्रमाणात लागवड करू. डेब्रीज माती हे ओपन ट्रकमधून नेहले जाणार नाही याचा सूचना दिलेल्या आहेत.
त्याचबरोबर प्रदुषण नियंत्रणात आणण्याचे आदेश मुख्यमंत्र्यानी दिले आहेत. तर आवश्कता भासल्यास दुबईतील कंपनीशी करार करून कृत्रिम पाऊस पाडू असंही शिंदे म्हणालेत. तर सर्व कामांची पाहणी मी करणार असल्याचंही ते म्हणालेत.
मुंबईतील वस्त्यांतील अंतर्गत भागातील स्वच्छता केली जाईल असे आदेशही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तर वांद्रे पूर्व, पश्चिम भागात मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली, तेथील नागरिकांशी संवाद देखील साधला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.