मिसेस मुख्यमंत्रीही म्हणतात 'बाईपण भारी देवा'; महानगरपालिकेच्या गणेशोत्सव मंडळाच्या कार्यक्रमाला लावली उपस्थिती

chief minister eknath shinde
chief minister eknath shinde
Updated on

ठाणे :- ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मंगळागौर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सौ. लता एकनाथ शिंदे या कार्यक्रमात उत्साहाने सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. महानगरपालिकेतील नरेंद्र बल्लाळ सभागृहात महापालिकेतील महिला अधिकारी व कर्मचारी यांनी मंगळागौर कार्यक्रम आयोजित केला होता.

लता एकनाथ शिंदे यांनीही कार्यक्रमाला उपस्थिती लावल्याने महिला कर्मचाऱ्यांना उत्साह वाढला. लता शिंदे यांनी यावेळी महिला कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. महिला कुटुंबामध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असतात. घरातील सर्वांची काळजी घेत असतात. महिलांचा उत्साह आनंददायक असल्याचं त्या म्हणाल्या.

chief minister eknath shinde
Eknath Khadse News : सीएमव्हीग्रस्तांना आठवडाभरात भरपाई द्यावी; एकनाथ खडसेंची मुख्यमंत्री कृषिमंत्र्यांकडे मागणी

महानगरपालिकेतील महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी यावेळी बाईपण भारी देवा सिनेमातील गाण्यावर सादरीकरण केले.महिलांचे हे सादरीकरण पाहून लता शिंदे खूष झाल्या. आपण बायका खरोखरच भारी असतो आणि तुमचा डान्स पाहून मला त्याची पुन्हा एकदा खात्री पटली, असं त्या महिलांना उद्देशून म्हणाल्या. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.

chief minister eknath shinde
CM Eknath Shinde : स्वामीनाथन यांच्या निधनाने शेतकऱ्यांसाठी आयुष्य वेचलेला सुपुत्र गमावला- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कार्यक्रमावेळी माजी उपमहापौर सौ.पल्लवी कदम, माजी नगरसेविका सौ. नम्रता भोसले-जाधव, अतिरीक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिलारी, सौ.मिनल पालांडे, श्रीमती वर्षा दिक्षीत, सौ.अनघा कदम यांच्यासह शिवसेनेच्या अनेक महिला पदाधिकारी उपस्थित झाल्या होत्या. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.