Eknath Shinde: या तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल करणार अर्ज, ठाण्यात भव्य शक्तीप्रदर्शन

Kopri Pachpakhadi Vidahnsabha Election: उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवांराकडून अर्ज भरण्यात येणार आहेत.
Eknath Shinde: या तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल करणार अर्ज,  ठाण्यात भव्य शक्तीप्रदर्शन
Updated on

Latest Thane News: शिवसेना शिंदे गटाने उमेदवारांची यादी अद्याप जाहीर झाली नसली तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवारी (ता.२४) कोपरी पाचपाखडी मतदारसंघातून अर्ज दाखल करणार आहेत. यानिमित्ताने भव्य मिरवणुकीतून शक्तीप्रदर्शन केले जाणार असल्याने ठाण्यातील सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी २३ ऑक्टोबरपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. २९ ऑक्टोबर अर्ज भरण्याची मुदत आहे. पण याचदरम्यान दोन दिवस सुट्ट्या येत असल्याने उमेदवारांना पाचच दिवस अर्ज भरण्यासाठी मिळणार आहेत. त्यामुळे उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवांराकडून अर्ज भरण्यात येणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.