मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांनी मुंबई पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. नार्वेकर यांनी एका अज्ञात व्यक्तीकडून व्हॉट्सअपवर धमकी मिळाल्याचा आरोप केला आहे.
मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांनी मुंबई पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. नार्वेकर यांनी एका अज्ञात व्यक्तीकडून व्हॉट्सअपवर धमकी मिळाल्याचा आरोप केला आहे. आमच्या मागण्या पूर्ण करा अन्यथा ईडी, एनआयए आणि सीबीआयची चौकशी करायला लावू अशी धमकी मिळाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. (Mumbai Latest Marathi News)
मिलिंद नार्वेकर यांना व्हॉट्सअपवर धमकी देणारा व्यक्ती कोण याची माहिती मिळू शकलेली नाही. पण, ईडी, एनआयए आणि सीबीआयची चौकशीची धमकी देण्यात आल्याने हे प्रकरण गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे. मिलिंद नार्वेकर यांनी मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे यासंदर्भात तक्रार केली आहे. आरोपीचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली आहे. आरोपीने नार्वेकर यांच्याकडे नेमकी कोणती मागणी केली याबाबत तपशील मिळालेला नाही. या प्रकरणातील पुढील घडामोडींकडे लक्ष असणार आहे.
शरद पवारांच्या नावाने निनावी फोन आल्याचं प्रकरण मिटत नाही. तोच मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांना व्हॉट्सअॅपवर धमकवण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय. मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी हे प्रकरण तपासासाठी मुंबईच्या गुन्हे शाखकडे सोपवलं आहे. मिलिंद नार्वेकर हे शिवसेनेचे सचिव आणि मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक आहे. ठाकरे कुटुंबियांच्या ते एकदम जवळची व्यक्ती म्हणून ओळखले जातात. विशेषता उद्धव ठाकरेंसोबत नार्वेकर हे त्यांच्या सावली सारखे मागे असतात. त्यामुळेच पोलिसांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घातलेलं आहे.
फोन करणाऱ्या व्यक्तीने नार्वेकरांना मेसेज करून काही मागणी केली ही मागणी पूर्ण न केल्यास त्या व्यक्तीने नार्वेकर यांना सीबीआय, ईडी किंवा इतर केंद्रीय तपास यंत्रणाद्वारे अडचणीत आणण्याची धमकी दिली. हा मेसेज पाहताच नार्वेकर यांनी हेमंत नगराळे यांच्या ही बाब निदर्शनास आणून देत लेखी तक्रारही दिली असल्याची माहीती सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संबधित नंबरची माहिती कंपनीकडे मागितली आहे. आरोपीने ज्या नंबरहून ही धमकी दिली आहे. त्यावेळी त्यांनी एका अॅप्लिकेशनचा वापर केला असावा. ज्याने करून पोलिसांची दिशाभूल होईल. या प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलिस अधिक तपास करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.