नवी मुंबईत सुरू होणार मुख्यमंत्री कार्यालय 

नवी मुंबईत सुरू होणार मुख्यमंत्री कार्यालय 
Updated on

नवी मुंबई : राज्यभरात मुख्यमंत्री कार्यालये सुरू करणार, या महाविकास आघाडीतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या घोषणेवर प्रशासनाने अंमलबजावणी सुरू केली आहे. सोमवारपासून नवी मुंबईत कोकण भवनच्या इमारतीमध्ये पहिले मुख्यमंत्री कार्यालय सुरू केले जाणार आहे.

या कार्यालयात सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न, सरकारच्या स्तरावर असलेली कामे, त्या संदर्भात प्राप्त होणारे अर्ज, निवेदने, संदर्भ मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, मंत्रालय, मुंबई येथे स्वीकारून त्यावर कार्यवाही करण्याकरिता संबंधित क्षेत्रीय स्तरावरील सरकारी यंत्रणेकडे पूढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती विभागीय महसूल आयुक्त शिवाजी दौंड यांनी दिली. 

राज्यभरातील शेतकरी व कामगारवर्गाला त्यांची गाऱ्हाणी सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यभरात मुख्यमंत्री कार्यालये स्थापन करणार असल्याचा दिलासा देणारा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला होता. प्रशासनात सध्या असणारे अपुरे मनुष्यबळ पाहता या निर्णयावर अंमलबजावणी होणार की नाही, अशी शंका विरोधकांकडून उपस्थित केली जात होती. मात्र या शंकेला छेद देत सरकारने प्रत्यक्षात घोषणेवर अंमलबाजणी करण्यास सोमवारपासून सुरुवात होणार आहे.

20 जानेवारीपासून बेलापूर येथील कोकण भवन इमारतीमध्ये कोकण विभागीय मुख्यमंत्री सचिवालय कक्ष कार्यान्वित होणार आहे. या कार्यालयात सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न, सरकारस्तरावरील कामे, त्या संदर्भात प्राप्त होणारे अर्ज, निवेदने, संदर्भ हे सर्व काही मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, मंत्रालय, मुंबई येथे स्वीकारून त्यावर कार्यवाही करण्याकरिता संबंधित क्षेत्रीय स्तरावरील सरकारी यंत्रणेकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात येणार आहेत. मात्र यात लोकाभिमुखता, पारदर्शकता व गतिमानता आणण्याच्या उद्देशाने विभागीय आयुक्त कार्यालयात "मुख्यमंत्री सचिवालय' कक्षाचे क्षेत्रीय कार्यालय सुरू करण्यात येणार असल्याचे दौंड यांनी सांगितले. उपायुक्त (महसूल) हे पदसिद्ध विशेष कार्य अधिकारी मुख्यमंत्री सचिवालय म्हणून काम पाहणार आहेत. एक नायब तहसीलदार, एक लिपिक/लिपिक टंकलेखक ही पदे या विभागातील कामकाज करणार आहेत. 

जनतेची निवेदने मार्गी लागणार 

विभागीय स्तरावरील मुख्यमंत्री सचिवालयाच्या क्षेत्रीय कक्षात सर्वसामान्य जनतेकडून मुख्यमंत्री यांना उद्देशून लिहिलेले दैनंदिन प्राप्त होणारे अर्ज, निवेदने, संदर्भ आदी स्वीकारण्यात येणार आहेत. याच कार्यालयात प्राप्त होणारे अर्ज, निवेदने, संदर्भ याबाबतची पोचपावती संबंधितांना देण्यात येईल. ज्या अर्जावर/संदर्भावर क्षेत्रीय स्तरावरच कार्यवाही अपेक्षित आहे, असे सर्व अर्ज, संदर्भ, निवेदने विभागाच्या नियंत्रणाखालील संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे त्वरित कार्यवाहीसाठी पाठविण्यात येतील. 

web title : Chief Minister's Office to be set up in Navi Mumbai

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.