मुंबई : बालकांना (children) मोकळा श्वास घेण्याची सोयच मुंबईत राहीलेली नाही. त्यातही भायखळा,आग्रीपाडा (Agripada) परीसरातील गर्दीमुळे बालकांना घराबाहेर घेऊन जाणेही अवघड. पण,आता या बालकांना बागडण्यासाठी (children entertainment) हक्काची जागा मिळणार आहे. मुंबई महानगरपालिका (bmc) मुंबई सेंट्रल जवळील आग्रीपाडा येथे पहिले बेबी पार्क (baby park) तयार करत आहे.
कोविड काळात मोकळ्या जागांचे महत्व अधोरेखीत झाले आहे.पण,मुंबईत मोठ्यांसाठी मोकळ्या जागा नाही तर लहान बालकांसाठी अशा मोकळा जागा मिळणे अवघडच आहे.त्यामुळे पालिकेने पहिले बेबी गार्डन उभारण्याचा निर्णय घेतला आहे.या बेबी गार्डन मध्ये लहान मुलांना बागडण्यासाठी स्वतंत्र जागा तयार करण्यात येणार आहे.तसेच,तरुण आणि जेष्टांसाठी खुली व्यायामशाळा आहे.लहान मुलांसाठी आकर्षित झाडेही लावण्यात येणार आहे.ही कामाची निवीदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे.
यासाठी दोन कोटी 49 लाखांचा खर्च अंदाजित आहे.महानगर पालिकेकडून कार्याध्येश मिळाल्यानंतर दिड वर्षाच्या आता हे उद्यान तयार होणार आहे. बालकांना दुध पाजण्यासाठी स्वतंत्र खोलीही या उद्यानात बांधण्यात येणार आहे.तसेच,पेव्हर ब्लॉक काही काळाने गुळगुळीत होतात.त्यावरुन पाच घसरुन पडण्याचीही भिती असते.त्यामुळे उद्यानातील पदपथ "रफ कोटा अथवा जैयसलमे'दगडांचा बनविण्यात येणार आहे.
खुल्या व्यायाम शाळे बरोबरच या उद्यानात योगा केंद्रही तयार करण्यात येणार आहे.हे संपुर्ण उद्यान बालकांपासून जेष्ठ नागरिकांना वापरता येईल अशा पध्दतीने तयार करण्यात येणार आहे.त्यामुळे मोठ्या मुलांच्या खेळण्यासाठी जागा असेल त्याच बरोबर स्वच्छतागृही आहे. या उद्यानातील दिवे,बाकेही आकर्षक पध्दतीने तयार करण्यात येणार आहेत.तसेच,संरक्षक जाळ्याही त्याच पध्दतीने बनविण्यात येणार आहेत.स्वच्छतेच्या दृष्टीने कचऱ्याचे डबेही तयार करण्यात येणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.