Thane Shed Fell: रात्री बारा वाजता भर पावसात खेळत होते फुटबॉल; टर्फवर पत्रा कोसळल्याने 8 मुले जखमी

Children playing in a football ground in Thane: गावंड बाग भागात फुटबॉल टर्फवर वाऱ्यासोबत उडून आलेला लोखंडी पत्र्याने 8 मुले जखमी झाली आहेत. एकूण १७ मुले याठिकाणी खेळत होते. रात्री बारा वाजताच्या सुमारास ही घटना घडलीये.
football ground
football ground
Updated on

ठाणे, ता. २१ : शहरात शुक्रवारी रात्री सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. तर गावंड बाग भागात फुटबॉल टर्फवर वाऱ्यासोबत उडून आलेला लोखंडी पत्र्याने 8 मुले जखमी झाली आहेत. एकूण १७ मुले याठिकाणी खेळत होते. रात्री बारा वाजताच्या सुमारास ही घटना घडलीये.

ठाणे शहरात सोसाट्याचा विजांच्या कडकडाटासह आलेल्या पावसाने ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. लुईसवाडी परिसरात रस्त्याकडेला उभ्या असलेल्या वाहनांवर वृक्ष पडल्याने वाहनांचे नुकसान झाले आहे.

पावसामुळे सखल भागांत पाणी साचले होते. अनेक भागात रात्री विद्युत पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले. शहरातील अंतर्गत आणि मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. गावंडबाग भागात फुटबॉलच्या टर्फ वाऱ्यामुळे उडून आलेला लोखंडी पत्रा कोसळला. यावेळी फुटबॉल खेळणारी चार ते पाच मुले जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून या मुलांवर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा पत्रा नेमका कुठून आला, याबाबतची माहिती मिळालेली नाही.



football ground
Thane Crime: डोंबिवलीतील वृद्ध महिलेच्या हत्येचा झाला उलगडा! मित्राला मेसेज केला अन् आरोपी फसला

छत पडून दोघे जखमी

२१ येऊर गावातील ठाणे महापालिकेच्या शाळा क्रमांक ६५ च्या छतावरील पत्र्याची शेड पडून दत्ता जनाटे (४२) आणि त्यांची चार वर्षांची मुलगी रिना जखमी झाली आहे. या घटनेत दोघेही किरकोळ जखमी असून दोन घरांचे नुकसान झाले आहे.

football ground
Thane Mahapalika: अतिधोकादायक इमारतींचा पाणी पुरवठा, वीज जोडणी, खंडित करा; आयुक्तांनी दिले निर्देश

येऊर गाव येथे तळ अधिक ४ मजली इमारत आहे. या इमारतीमध्ये ठाणे महापालिकेची शाळा क्रमांक ६५ चा कारभार सुरू आहे. या इमारतीच्या छतावरील अंदाजे ३६ फूट लांब व २२ फूट रुंदीची शेड घरांवर पडल्याने दोन जण जखमी आहेत. याबाबतची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेतली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.