आता 'कोरोना' तुम्हाला स्पर्श देखील करू शकणार नाही, कसा ? 'असा'...

आता 'कोरोना' तुम्हाला स्पर्श देखील करू शकणार नाही, कसा ? 'असा'...
Updated on

मुंबई : जगभरात कोरोना व्हायरस प्रचंड वेगानं पसरत चालला आहे. चीननंतर आता भारतातही कोरोना पसरू लागला आहे. आतापर्यंत  कोरोनामुळे अनेकांचे जीव गेले आहेत. मात्र आता तुम्हाला घाबरण्याची गरज नाहीये. कारण कोरोनावर अजून औषध सापडलं नसलं तरी 'कोरोनाप्रूफ' कवच तयार झालयं.

चीनचे आर्किटेक्ट 'दायोंग सुन' यांनी कोरोनाप्रुफ कवच तयार केलं आहे. वटवाघळांची रोगप्रतिकारक शक्ती आणि त्यांचे पंख यांचा अभ्यास करून त्यांनी असं कवच तयार केलं आहे.वटवाघळामध्ये रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते. उडताना त्यांच्या शरीराचं तापमान ४० अंश डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचतं. ज्यामुळे हवेतल्या व्हायरस आणि बॅक्टेरियांमुळे त्यांना हानी पोहोचत नाही. 

कोरोना व्हायरस ५५ अंश सेल्सिअस तापमानात नष्ट होतात. हे कवच फायबर फ्रेमवर 'थर्मोप्‍लास्टिक स्‍ट्रेचेबल मटेरियलपासून' तयार करण्यात आलं आहे. फायबर फ्रेममध्ये असणाऱ्या युवी लाइट्समुळे कवचाच्या आतलं तापमान वाढेल आणि लोकांपर्यंत कोरोना पोहोचू शकणार नाही असं दायोंग यांचं म्हणणं आहे.  हे कवच बॅगसारखं घालता येणार आहे. हे कवच घातल्यानंतर फुग्यासारखं पसरेल आणि त्यामुळे कोरोनापासून रक्षण करता येऊ शकणार आहे.

हेही वाचा: कोरोना प्रतिबंधासाठी राज्य शासन सज्ज.. नागरिकांनी भीती न बाळगता काळजी घ्यावी 
 
दायोंग सून यांनी कोरोनाप्रुफ कवचाचं डिझाईन तयार केलं आहे. मात्र अजून प्रत्यक्षात हे कवच बनवण्यात आलेलं नाहीये. अल्ट्रा व्हॉलेट लाईट्समुळे मानवाच्या शरीराला धोका निर्माण होऊ शकतो असं काही तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे आता हे कवच तयार होईल का आणि खरंच यामुळे कोरोनापासून मानवी शरीराचं संरक्षण होऊ शकेल का हेच बघणं महत्वाचं असणार आहे.  

China Architect introduced Coronaproof jacket for protection against corona virus 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.