चीनची आणखी एक वाहन कंपनी भारतात धुमाकूळ घालणार 

file photo
file photo
Updated on

मुंबई : चीनच्या प्रमुख वाहन उत्पादक कंपन्यांमधील एक अशी ओळख असणारी ग्रेट वॉल मोटर्स (जीडब्ल्यूएम) लवकरच दिल्लीमध्ये सुरू होणाऱ्या वाहन मेळाव्यात आपली अनेक उत्पादने आणि तंत्रज्ञान भारतीय बाजारात सादर करणार आहे. यामुळे भारतीय वाहन बाजारातील स्पर्धा आणखी तीव्र होणार आहे. 

कंपनीने हॅवल ब्रण्डच्या अंतर्गत एसयूव्ही, हॅवल कॉन्सेप्ट एच आणि कॉन्सेप्ट व्हीजन 2025 ला सादर करण्याचे निश्‍चित केले आहे. याच्यासह कंपनी इलेक्‍ट्रिक उत्पादने, सुरक्षा आणि कनेक्‍टिव्हीटीशी संबंधित सादर करणार आहे. 

हॅवल एच कॉन्सेप्टच्या टीझरमध्ये हॅवल एफ 7 एसयूव्ही सादर करण्यात येणार असल्याचे लक्षात येते. ही एसयूव्ही सध्या रशिया आणि चीन या दोन देशांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. हॅवल एच कॉन्सेप्ट टोयोटा फॉर्च्युनर आणि फोर्ड एंडोवरला टक्‍कर देण्याची शक्‍यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात एफ7 एसयूव्ही 1.5 लीटर आणि 2.0 लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आणि ऑटोमॅटीक ट्रान्समिशनसह येते. 


कॉन्सेप्ट व्हीजन 2025 बाबत बोलायचे झाले तर 2019 मध्ये शंघाई आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाईल उद्योग मेळाव्यात जागतिक बाजारात दाखल होणार असल्याचे सांगितले होते. जीडब्ल्यूएमचे अध्यक्ष व्युई जिआनाज्यून यांनी म्हटले होते की, भारताच्या वाहन क्षेत्रात दाखल होणार असल्याचा आम्हाला अतिशय आनंद आहे. आम्ही भारतामध्ये असणाऱ्या अमर्याद संधींबाबत अतिशय उत्साहित आहोत. भारतीय बाजारपेठ आमच्यासाठी अतिशय महत्वाची आहे.

जानेवारीच्या सुरुवातीला जीडब्ल्यूएमने जनरल मोटर्स इंडियाच्या तळेगाव कारखान्याला खरेदी करण्याचा करार केला आहे. सध्या 60 पेक्षा अधिक देशांमध्ये जीडब्ल्यूएमचे विक्री नेटवर्क आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.