Chota Rajan: कुख्यात गुंड छोटा राजनला आणखी एक जन्मठेप, या प्रकरणी झाली शिक्षा

Chota Rajan: कुख्यात गुंड छोटा राजनला आणखी एक जन्मठेप, या प्रकरणी झाली शिक्षा
Chota Rajansakal
Updated on

Mumbai News : हॉटेलव्यवसायी जया शेट्टी खून प्रकरणात तब्बल २३ वर्षानंतर विशेष कोर्टाने आज गँगस्टर छोटा राजन याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मोक्का कोर्टाचे विशेष न्यायाधीश ए.एम.पाटील यांनी या खून प्रकरणात छोटा राजन याला दोषी ठरवले. पत्रकार जे डे प्रकरणी छोटा राजन दिल्लीच्या तिहार कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.

जया शेट्टी या मध्य मुंबईतील गामदेवी येथील गोल्डन क्राऊन हॉटेल चालवत होते. ४ मे २००१ रोजी या हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर छोटा राजन टोळीतील. दोन सदस्यांनी गोळ्या घालून जया शेट्टी यांना ठार केले. हॉटेल मॅनेजरच्या तक्रारीवरुन मुंबई पोलिसांनी या प्रकरणात खूनाचा गुन्हा दाखल केला.(chota rajan)

Chota Rajan: कुख्यात गुंड छोटा राजनला आणखी एक जन्मठेप, या प्रकरणी झाली शिक्षा
Akola Crime : ७८ वर्षीय वृद्ध महिलेवर अत्याचार; पोलिसात गुन्हा दाखल

. पोलिस तपासात छोटा राजन टोळीचा सदस्य असलेल्या हेमंत पुजारी याने जया शेट्टी यांना खंडणीसाठी कॉल केल्याचे स्पष्ट झाले. खंडणी देण्यास नकार दिल्यामुळे जया शेट्टी यांची गोळ्या घालून हत्या केल्याचा निष्कर्ष पोलिस तपासात काढण्यात आला.(mumbai crime news)

यानंतर छोटा राजन आणि त्याच्या टोळीतील इतर आरोपीविरुध्द खंडणी मागणे तसेच मकोका अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. यापुर्वी दोन वेगवेगळ्या सुनावणीत कोर्टाने २०१३ मध्ये अजय मोहीते, प्रमोद धोंडे, राहुल पावसरे या तीन जणांना दोषी ठरवले, त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. तर याच प्रकरणात एकाची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.(marathi news)

Chota Rajan: कुख्यात गुंड छोटा राजनला आणखी एक जन्मठेप, या प्रकरणी झाली शिक्षा
Pune Crime : नवी सांगवीत गोळीबार; तरुणाचा खून

घटनाक्रम

- जया शेट्टी यांच्याकडून ५० कोटीची खंडणीची मागणी

- जया शेट्टी यांची ४ मे २००१ ला गोळी घालून हत्या

- या प्रकरणात छोटा राजन दोषी

- शेट्टी गामदेवीच्या गोल्डन क्राऊल हॉटेलची मालक

- २०१३ मध्ये तीन जणांना जन्मठेपेची शिक्षा.(maharashtra news)

Chota Rajan: कुख्यात गुंड छोटा राजनला आणखी एक जन्मठेप, या प्रकरणी झाली शिक्षा
Beed Crime : पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्याचे अपहरण ; दोन कोटी रुपये खंडणीची मागणी, सुटका करून गाठले पोलिस ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.