Mumbai : ख्रिस गेल बेकायदेशीर चित्रिकरण! टीव्हीवर जाहिरात येताच यंत्रणेला जाग; गुन्हा दाखल होणार?

Chris Gayle
Chris Gayle ESAKAL
Updated on

नितीन बिनेकर

मुंबई : परवानगी न घेता वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज ख्रिस गेल याने समुद्रात जाऊन चित्रीकरण केल्याचे वृत्त 'सकाळ'ने दिले होते. मात्र मुंबई पोर्ट ट्रस्टकडून कुठलीही कारवाई झाली नव्हती. मात्र आता ख्रिस गेलच्या समुद्रात चित्रिकरण झालेली जाहिरात प्रदर्शित होताच, मुंबई पोर्ट ट्रस्टकडून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरु झाली आहे.

Chris Gayle
Karnataka Election "लेकर बजरंगबली का आशीर्वाद, जनता चली काँग्रेस के साथ', म्हणत नागपुरात हनुमान चालिसाचं वाटप

हे चित्रिकरण करणाऱ्या कंपनीवर लवकरचं गुन्हा दाखल होण्याची शक्यता असल्याची माहिती पोर्ट ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी 'सकाळ'ला दिली आहे. आयपीएल सामन्यांचे समालोचन करण्यासाठी जगभरातील अनेक आजी- माजी क्रिकेटपटू सध्या भारतात आहेत. त्यात क्रिकेटपटू ख्रिस गेलचाही समावेश आहे.

२७ एप्रिलला एका व्यावसायिक जाहिरातीच्या चित्रीकरणासाठी गेल मुंबईत आले होते. परवानगी न घेता गेल आणि त्याच्या टिमने समुद्रात जाऊन बेकायदाशीर चित्रीकरण केले.शुक्रवारपासून सर्व राष्ट्रीय चॅनेलवर गेलची समुद्रात चित्रिकरण झालेली पान मसाल्याची जाहिरात प्रदर्शित झाल्याने आता मुंबई पोर्ट ट्रस्टचे अधिकारी अँक्शन मोडवर आले आहे. लवकरचं शूटींगसाठी वापरलेल्या बोटीची झाडाझडती होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Chris Gayle
karnataka assembly election 2023 : "बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना", शिंदेंची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका

'सकाळ'च्या वृत्तानंतर दलाल फरार

समुद्रात शूटींग करण्यासाठी लागणाऱ्या किचकट प्रक्रियेतून सुटका करुन घेण्यासाठी काही स्थानिक अधिकाऱ्यांना आणि दलालांना पकडून जाहिरात कंपनीने हे चित्रीकरण करून घेतले. या रॅकेटमुळे मुंबई पोर्ट ट्रस्टचे आर्थिक नुकसान तर होतचं आहे. शिवाय सागरी सुरक्षा धोक्यात येण्याची शक्यता आहे. 'सकाळ'च्या वृत्तानंतर चित्रीकरणाचे रॅकेट चालविणारे दलाल दोन आठवड्यापासून अंडरग्राऊंड झाल्याची माहिती आहे.

समुद्रात बेकायदेशीर झालेल्या चित्रीकरण प्रकरणाची आम्ही चौकशी सुरु केली आहे. आता टीव्हीवर प्रदर्शित झालेल्या जाहिरातीची व्हिडीओ क्लिप आम्ही चौकशी अधिकाऱ्यांकडे पाठविले आहे. चौकशी अहवाल आल्यानंतर आम्ही कारवाई करू.

-कॅप्टन बी. चांद, उप संरक्षक अधिकारी, मुंबई पोस्ट ट्रस्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.