नवी मुंबई : सिडको (CIDCO) महामंडळातर्फे सिडको इन्व्हेस्टमेन्ट ॲन्ड इन्फ्रास्ट्रक्चर समीटचे आयोजन करण्यात आले आहे. ८ ऑक्टेबर २०२१ पासून हे समिट व्हर्च्युअल पद्धतीने संपन्न होणार आहे. नवी मुंबईमध्ये (navi mumbai) उपलब्ध असलेल्या गुंतवणुकीच्या विविध संधींविषयी (Investments chance) या कार्यक्रमात चर्चा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात स्वतंत्र आणि समर्पित सत्रांमध्ये नवी मुंबईमध्ये यापूर्वीच ज्यांनी गुंतवणूक केली आहे असे गुंतवणूकदार नवी मुंबईत गुंतवणूक करण्याचे फायदे आणि नवी मुंबईमध्ये गुंतवणूक करण्याकरिता सर्वसाधारण माहिती याविषयी सर्वसाधारण जनतेशी संवाद साधणार आहेत.
या कार्यक्रमात नियोजित काळात विविध प्रकल्प पूर्ण करण्याच्या सिडकोच्या क्षमता आणि नवी मुंबईमध्ये सिडकोकडून करण्यात आलेली बांधकामे आणि विकास याबद्दलही माहिती देण्यात येणार आहे. तसेच नवी मुंबईतील आतिथ्य, आरोग्य, शिक्षण, क्रीडा व इतर क्षेत्रांचा विकास सुकर व्हावा, याकरिता सिडकोने हाती घेतलेल्या विविध विकास प्रकल्पांबद्दलही या कार्यक्रमात माहिती सांगण्यात येणार आहे. सिडकोने नेहमीच नवी मुंबईच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित केले आहे.
हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सिडकोने अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले आणि नवी मुंबईतील जीवनमान उंचावण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास केला. महागृहनिर्माण योजना, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नवी मुंबई मेट्रो, कॉर्पोरेट पार्क इ. प्रकल्पांचे काम प्रगतिपथावर असून या प्रकल्पांमुळे नवी मुंबईतील पायाभूत विकास क्षेत्रात आमूलाग्र बदल घडून येणार आहेत. तसेच सिडकोने शहराला उत्तम संधानता (कनेक्टिव्हिटी) लाभण्यावर लक्ष केंद्रित केल्यामुळे भावी गुंतवणूकदारांना गुंतवणुकीच्या उत्तम संधी उपलब्ध होणार आहेत.
सदर कार्यक्रम हा सिडको आणि भावी गुंतवणूकदार, विकासक, बांधकाम कंपन्या व संघटना यांदरम्यान संवाद प्रस्थापित करण्याकरिता उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे. यामुळे सिडकोला नवी मुंबईमध्ये गुंतवणुकीच्या व्यवहार्य आणि आकर्षक संधी निर्माण करण्याकरिता उपाययोजना आणि धोरण आखण्यास मदत होणार आहे. या कार्यक्रमास सिडकोतील अधिकाऱ्यांसह नरडेको, क्रेडाई आणि एमसीएचआय यांसारख्या नामांकित संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.