मुंबई - वरळी आणि धारावी परीसरातील नागरीकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी महापालिका हायड्रोक्लोरोक्वीनचा डोस देणार आहे. १८ ते ५५ वयोगटातील निरोगी नागरीकांना हा डोस देण्यात येणार आहे.
धारावीतील ५० हजार आणि वरळीतील ५० हजार नागरीकांपैकी कोणताही आजार नसलेल्या व्यक्तींना या गोळ्या उद्यापासून देण्यास सुरवात होणार आहे. सात आठवडे हे औषध देण्यात येणार आहे. 'पहिल्या आठवड्यात प्रत्येकी २ गोळ्याा आणि पुढील प्रत्येक आठवड्यात प्रत्येकी १ गोळी देण्यात येणार आहे. लवकरत याची सुरवात करण्यात येणार आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मलेरीयाच्या रुग्णांना ही औषधे दिली जातात'. पालिकेचे अतिरीक्त आयुक्त सुरेश काकानी यांनी याबाबत माहिती दिलीये.
मोठी बातमी - व्हायरसच्या मदतीनं तयार केल्या जाऊ शकतात बॅटरीज...
धारावीत आता पर्यंत कोरोनाचे ५५ रुग्ण आढळले आहेत. तर, वरळी प्रभादेवी परीसरात २७० रुग्ण आढळले आहेत.त्यामुळे पालिकेने या भागातील नागरीकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यस्थानमधिल जयपुर मधिल कोरोनाग्रस्त रुगणांच्या उपचारासाठी या औषधांचा वापर झाला होता. त्यानंतर अमेरिकेनेही ही औषधं भारताकडून मागवून घेतली आहेत.
आरोग्य सेविकांचं रॅपिड टेस्टिंग
याची सुरवात या आठवड्याभरात होणार आहे. सुरवातीच्या टप्प्यात आरोग्य सेविकांची तपासणी करण्यात येणार आहे. आरोग्य सेविका सध्या शहरभरात फिरुन तापाचे रुग्ण शोधण्याबरोबरच जनजागृती करत आहेत.
citizens of worli and dharavi area will get dose of hydroxychloroquine tablets
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.