मुंबई : शहरातील (City) झेंडा उत्पादक मुख्तार अहमद हे गेल्या अनेक वर्षांपासून (Years) भारताच्या (India) झेंड्याची (Flag) निर्मिती करत आहेत. १५ ऑगस्ट (August) तसेच २६ जानेवारीसाठी (January) ते दर वर्षी (Years) किमान १० ते १५ लाख झेंडे तयार करतात; मात्र कोविडच्या (Covid) पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे (Lockdown) उत्पादन क्षमता घटली (Less) व त्यामुळे या वर्षी केवळ ५० हजार झेंडे (Flags) तयार करू शकल्याचे त्यांनी सांगितले.
इतर छोट्या व्यवसायाप्रमाणेच मुंबईतील जवळपास सर्वच झेंडा व्यावसायिकांनादेखील कोरोनाचा खूप मोठा फटका बसला आहे. ४० वर्षीय मुख्तार हे कुर्ला परिसरात कुरेशी नगर येथे राहतात. बालपणापासून व्यवसाय करण्याची आवड असल्याने मुख्तार यांनी झेंडे बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. मुख्तार यांचे पूर्ण कुटुंब गेली २० वर्षे झेंडे बनवण्याचे काम करत आहेत. दर वर्षी किमान १२ ते १५ लाख झेंडे बनवून ते विकतात. यातून किमान घर चालेल, एवढा नफा त्यांना मिळत होता; मात्र दोन वर्षांपूर्वी आलेल्या कोरोनामुळे नफा तर नाहीच, उलट मोठे नुकसान त्यांना सहन करावे लागले आहे. यंदा दुकानदारांकडून नेहमीप्रमाणे खरेदी झाली नाही; तसेच झेंडेही तयार झाले नाहीत, अशी खंत मुख्तार यांच्या संपूर्ण कुटुंबाने व्यक्त केली आहे.
फक्त २० हजारांचा नफा कुर्ल्यासह ,मुंबईतील बऱ्याचशा दुकानदारांना झेंडे विकायचो. त्यानुसार यापूर्वी किमान एक लाख झेंड्याची विक्री होत असे. यंदा माल न मिळाल्याने उत्पादन आणि विक्री दोन्हींवर फरक पडला आहे. या वर्षी फक्त ५० हजार झेंडे बनवले. त्यातून फक्त २० हजार रुपये नफा झाला आहे. कोरोनामुळे अपेक्षित विक्रीच होत नाही, असे झेंडा व्यावसायिक मुख्तार अहमद यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.