रायगड, कोल्हापूरमध्ये पूरग्रस्तांच्या मदतीला BMC, दोन पथके रवाना

रायगड
रायगड
Updated on
Summary

मुंबई महानगरपालिकेची दोन पथके पूरग्रस्त रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाली आहेत.

मुंबई - मुंबई महानगरपालिकेची दोन पथके पूरग्रस्त रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाली आहेत. तज्ञ डॉक्टरांसह आपत्कालीन व्यवस्थापन कर्मचाऱ्यांचा या पथकामध्ये समावेश आहे. पालिकेचे एक पथक रायगड जिल्ह्यातील महाड येथे मदत कार्य करण्यास रवाना झाला आहे. यामध्ये दोन वैद्यकीय पथके, 1 फिरती वैद्यकीय प्रयोगशाळा, घन कचरा व्यवस्थापन खात्यातील सुमारे 75 कर्मचारी, पाण्याचे 4 टँकर, 1 टोइंग लाॅरी इत्यादींचा समावेश आहे.

याबाबत वैद्यकीय विषयक बाबींचे व्यवस्थापन हे मुंबई महानगरपालिकेच्या सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.मोहन जोशी हे करीत आहेत. तर आपत्कालीन व्यवस्थापन विषयक कार्यवाही आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाचे संचालक महेश नार्वेकर करीत आहेत.

रायगड
राज्यातील पूरबळींची संख्या १४९ वर; किमान १०० जण बेपत्ता

कोल्हापूर येथील पूर बाधित परिसरातील पर्जन्य जलवाहिन्या आणि मलनिस्सारण वाहिन्यांविषयी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या दृष्टीने मुंबई महानगरपालिकेची आणखी एक चमू आज कोल्हापूरकडे रवाना झाला आहे. कोल्हापूरच्या दिशेने प्रस्थान केलेल्या संबंधित कर्मचाऱ्यांच्या चमुसोबत 'रिसायकल मशीन' आणि इतर आवश्यक यंत्रसामग्री देखील पाठविण्यात आली आहे.

याआधी सन 2019 मध्ये कोल्हापुरात अशाच स्वरूपाची पूर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळीही मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांतर्फे कोल्हापुरात विविध नागरी सेवा सुविधा सुसज्ज करण्यासाठी पालिकेचे डॉक्टर आणि आपात्कालीन पथक तैनात झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.