CM Eknath Shinde Announces State Funeral For Baba Siddique:
मुंबईतील वांद्रे पूर्व भागात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री तीन अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली. त्यानंतर आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी (१३ ऑक्टोबर) सिद्दिकी यांच्यावर पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची घोषणा केली.
मुख्यमंत्री कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, मुख्यमंत्री शिंदे यांनी 2004 ते 2008 दरम्यान काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मंत्री म्हणून काम केलेल्या सिद्दिकीसाठी शासकीय अंत्यसंस्कार आयोजित करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
आता या घटनेवर मुंबई पोलिसांनी सांगितले की, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचे प्रकरण सुपारी किलिंग असू शकते.
या घटनेची माहिती मुंबई पोलिसांना मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून दोघांना अटक केली, तर तिसरा आरोपी अद्याप पोलिसांच्या ताब्यात नाही.
या वर्षी फेब्रुवारीमध्ये बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश केला होता. सिद्दीकी यांना अवघ्या 15 दिवसांपूर्वी जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर त्यांच्या सुरक्षेचा विचार करून त्यांना Y श्रेणीची सुरक्षाही देण्यात आली होती.
गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस बाबा सिद्दीकी यांच्या एसआरए प्रकल्पाशी संबंधित प्रकरणाचा तपास करत आहेत.
मालमत्तेच्या वादातून त्यांची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून त्यांचे बिष्णोई टोळीशी संबंध आहेत का? याचा शोध घेतला जात आहे.
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर राजकारणापासून ते चित्रपटसृष्टीपर्यंत सर्वांनाच धक्का बसला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.