Eknath Shinde: ठाकरे-केजरीवाल भेटीवर प्रश्न विचारताच CM शिंदे भडकले; म्हणाले, कोणीही...

पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली यंदा लोकसभा निवडणुकीचे सर्व रेकॉर्ड तुटतील असंही मुख्यंमत्र्यांनी म्हटलं.
Uddhav Thackeray, Eknath Shinde, Arvind Kejriwal
Uddhav Thackeray, Eknath Shinde, Arvind Kejriwal
Updated on

मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारताच ते काहीसे भडकले. तसेच त्यांनी PM मोदींच्या कौतुकाचा पाढा वाचला. (CM Eknath Shinde flares up when questioned on Thackeray Kejriwal meeting)

Uddhav Thackeray, Eknath Shinde, Arvind Kejriwal
Kharip Review Meeting: "शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ येणार नाही"; CM शिंदेंनी दिल्या 'या' सूचना

शिंदे म्हणाले, "देशात कोणीही कोणाला भेटू शकतं, अशा भेटींना काहीही प्रॉब्लेम नाही. पण असं कोणीही भेटल्यानं निवडणुका जिंकता येत नाहीत. यापूर्वी देखील सर्व पक्षांनी एकत्र येण्याचा प्रयत्न केला आहे. पण देशाला पुढे न्यायचं असेल तर मोदींच्या नेतृत्वाशिवाय पर्याय नाही. त्यामुळं अशा बैठकीनं काहीही फरक पडत नाही.

Uddhav Thackeray, Eknath Shinde, Arvind Kejriwal
Gyanvapi Case : "औरंगजेब क्रूर नव्हता, त्याने विश्वेश्वर मंदिर पाडले नाही"

सध्या G20चं अध्यक्षपद भारताकडं

सध्या आपल्या देशाचा विकास जगासमोर आहे. इतक्या देशांची अर्थव्यवस्था अडचणीत असतानाही आपली अर्थव्यवस्था ११व्या स्थानावरुन पाचव्या स्थानावर कोणी आणली? पंतप्रधान मोदींनीच! हे तर सर्वांच्या समोर आहे. जग आपल्या देशाचा सन्मानं करतंय ही तर चांगली गोष्ट आहे. यासाठी विरोधक थोडेच चांगलं बोलणार आहेत. जनतेला माहिती आहे की, देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी शेतकऱ्यांसाठी, समाजाच्या प्रत्येक घटकांसाठी मोदी काम करत आहेत, ते जो निर्णय घेतला तो जगासमोर आहे. सध्या G20 चं अध्यक्षपद भारताला मिळालं आहे याचा अर्थ आपल्या देशाची प्रगती होत आहे.

Uddhav Thackeray, Eknath Shinde, Arvind Kejriwal
Pune : कोथरूडकरांना हवा लोकशाहीचा अनुभव ! महापालिका निवडणूक नाही, कमीत कमी वार्डसभा तरी घ्या...

यंदाच्या लोकसभेत सर्व रेकॉर्ड मोडतील

नव्या उंचीवर आपली अर्थव्यवस्था जात आहे. 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं ध्येय आपल्याला गाठायचं आहे. त्यामुळं विरोधीपक्षानं सहकार्य करायला पाहिजे. जनतेला माहिती आहे की, इतक्या वर्षांत देशाला कोणी लुटलं आहे. गेल्या ९ वर्षांत जे काही झालं ते ७० वर्षात आपल्याकडं झालं नाही. त्यामुळं जनता बरोबर निर्णय घेईल. आत्तापर्यंत लोकसभा निवडणुकीचे जे निकाल आहेत ते येत्या निवडणुकीत तुटतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.