राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना घेरलं! विधानसभा अध्यक्षांनी सावरलं

विधानसभेत चर्चेला सुरुवात झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या चार बड्या नेत्यांनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्तीच सुरु केली.
eknath shinde
eknath shindesakal
Updated on

मुंबई : विधानसभेत आज विविध मुद्द्यांवर चांगलीच गरमागरम चर्चा झाली. आजच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर तासाभरातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार बड्या नेत्यांनी घेरलं आणि एकामागून एक प्रश्नांची सरबत्ती सुरु केली. अचानक प्रश्नांचा भडीमार सुरु झाल्यानं मुख्यमंत्री गडबडले पण यावेळी त्यांच्या मदतीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे धाऊन आले. त्यांनीच स्वतः विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. (cm eknath shinde is being stuck by NCP leaders Speaker Rahul Narvekar came to help)

eknath shinde
पवारांच्या बालेकिल्ल्यासाठी मनसेची रणनीती; वसंत मोरेंवर सोपवली महत्वाची जबाबदारी

मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीलाच महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी सुधारणा विधेयकावर चर्चेचा मुद्दा उपस्थित केला. तसेच थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडीचं विधेयकही मांडलं. यानंतर विधानसभेचे विरोधीपक्ष नेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि छगन भुजबळ या नेत्यांनी शिंदेंना एकामागून एक प्रश्न विचारुन भांभावून सोडलं.

eknath shinde
Manish Sisodia: मनीष सिसोदियांसारख्या व्यक्तीला भारतरत्न द्यायला हवा - केजरीवाल

आव्हाड म्हणाले, जनतेतून नगराध्य़क्ष निवडीऐवजी सदस्यांमधून नगराध्यक्ष निवडीचा निर्णय एकनाथ शिंदे हे नगविकासमंत्री असताना घेतला होता. पण आता त्यांनी आपला निर्णय बदलला. त्यामुळं यावर शिंदेंनी आपला निर्णय बदललाच कसा? यामागचं काही सबळ कारण त्यांनी सांगितलं आहे? असा सवाल त्यांनी विचारला. त्यानंतर जंयत पाटील पॉईंट ऑफ आर्थुर सांगण्यासाठी रांगेत उभे राहिले. यानंतर मुख्यमंत्री काहीशी गडबडलेले पाहिल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर त्यांनीच मुख्यमंत्र्यांना सावरल्याचा प्रत्न केला.

eknath shinde
DA Arrears: केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार कोरोना काळातील थकीत 'महागाई भत्ता'

दरम्यान, अजित पवारांनी चांगलीच फटेकेबाजी केली. त्यांनी म्हटलं, एकतर तुम्ही हे विधेयक मागे घ्यावं, आपल्याला शक्य नसेल तर ते संयुक्त समितीकडे पाठवा. दोन्ही सभागृहातील दिग्गज यावर अभ्यास करतील आणि त्यानंतर ओग्य निर्णय होईल. यावेळी जसं आमदारांमधून निवडून येऊन तुम्ही मुख्यमंत्री झालात. पण ग्रामपंचायतमधील हा अन्याय कसला. दुसरीकडे छगन भुजबळांनीही मुख्यमंत्र्यांना घेरलं. भुजबळ म्हणाले, एकनाथ शिंदे आमचे चांगेल मित्र आहेत पण त्यांची वैचारिक भूमिका वारंवार बदलते आहे. आपणच घेतलेले निर्णय आपण बदलोत ाहोत हे काय सुरु आह? असा सवालही त्यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.