काय ते स्वित्झर्लंड अन् काय ती उधारी... CM शिंदेंच्या दौऱ्याची करोडोंची थकबाकी, कंपनीने पाठवली कायदेशीर नोटीस

Swiss Firm Sends Legal Notice Over Unpaid Rs 1.58 Crore to Maharashtra Government | स्विस फर्मने दिलेल्या नोटीसनुसार,वारंवार मागणी करूनही MIDC कडून देयके मिळाली नाहीत आणि त्यांच्याकडून केवळ विलंबाचे कारण सांगितले गेले आहे. या मुद्द्यावर राज्य सरकारच्या कायदेशीर टीमने जलद तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे, अन्यथा फर्मने कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.
Maharashtra Chief Minister Eknath Shinde's team faces legal action from a Swiss firm over unpaid bills from the Davos World Economic Forum 2024.
Maharashtra Chief Minister Eknath Shinde's team faces legal action from a Swiss firm over unpaid bills from the Davos World Economic Forum 2024.esakal
Updated on

महाराष्ट्र सरकारला स्वित्झर्लंडस्थित एका सेवाश्रेत्र कंपनीने 1.58 कोटी रुपयांच्या बिले न भरल्यामुळे कायदेशीर नोटीस पाठवली आहे. ही बिले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या टीमच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) दरम्यानच्या दावोस, स्वित्झर्लंड दौऱ्यातील पाहुणचार सेवांसाठी आहेत. हा दौरा जानेवारी 2024 मध्ये झाला होता.

कायदेशीर नोटीस-

28 ऑगस्ट रोजी, स्वित्झर्लंडमधील SKAAH GmbH या फर्मने महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (MIDC), मुख्यमंत्री कार्यालय, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम यांना नोटीस पाठवली. या नोटीसमध्ये दावा करण्यात आला आहे की, MIDC ने या फर्मकडून मिळालेल्या पाहुणचार सेवांचे 1.58 कोटी रुपये थकवले आहेत. WEF दरम्यान, 15 ते 19 जानेवारीच्या कालावधीत दिलेल्या सेवांसाठी या फर्मने बिले सादर केली होती. MIDC ने या बिलांपैकी 3.75 कोटी रुपये आधीच भरले असून, उर्वरित रक्कम थकीत आहे.

विरोधकांचा आरोप आणि सरकारचे स्पष्टीकरण

विरोधकांच्या महाविकास आघाडीतील नेत्यांनी या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली आहे. शिवसेना (UBT) चे आमदार आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सरकारने दावोस दौऱ्यावर अवाजवी खर्च केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी सोशल मिडिया प्लॅटफार्म एक्सवर नोटीस देखील शेअर केली आहे.

उद्योग मंत्री उदय सामंत यांनी या नोटीसबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले की, "आम्ही कोणताही अतिरिक्त खर्च केलेला नाही. हे केवळ महाविकास आघाडीचे आमदारांचे आरोप आहेत. आमची कायदेशीर टीम या नोटीला उत्तर देईल आणि प्रश्न स्पष्ट केला जाईल."

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी टीका करताना म्हटले, "महाराष्ट्र सरकारच्या अशा ढिसाळपणामुळे महाराष्ट्राची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर खराब होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांवर वाईट परिणाम होईल."

Maharashtra Chief Minister Eknath Shinde's team faces legal action from a Swiss firm over unpaid bills from the Davos World Economic Forum 2024.
एकाही गद्दारला मी रोजगार देणार नाही; उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री शिंदे यांच्याबरोबर गेलेल्यांना इशारा

नोटीसचे परिणाम आणि आंतरराष्ट्रीय संबंध

नोटीसमध्ये दावा करण्यात आला आहे की, "MIDC ने थकीत रक्कम न भरल्यामुळे आमच्या क्लायंटचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या प्रकरणात महाराष्ट्र सरकारने तत्काळ तोडगा काढावा, नाहीतर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत आणि स्वित्झर्लंडमधील संबंधांवर वाईट परिणाम होऊ शकतो."

या नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, जरी दिलेल्या सेवांचा कालावधी ठरलेल्या व्यक्तींसाठी मर्यादित असला तरी, WEF दरम्यान उपस्थित व्यक्तींची संख्या जास्त होती आणि फर्मने सर्व मागण्या पूर्ण केल्या होत्या. तरीदेखील, MIDC ने वेळेत पैसे न दिल्यामुळे फर्मला आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे.

स्विस फर्मने दिलेल्या नोटीसनुसार,वारंवार मागणी करूनही MIDC कडून देयके मिळाली नाहीत आणि त्यांच्याकडून केवळ विलंबाचे कारण सांगितले गेले आहे. या मुद्द्यावर राज्य सरकारच्या कायदेशीर टीमने जलद तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे, अन्यथा फर्मने कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.

Maharashtra Chief Minister Eknath Shinde's team faces legal action from a Swiss firm over unpaid bills from the Davos World Economic Forum 2024.
Sharad Pawar: तुतारीची उमेदवारी मिळवण्यासाठी काय आहे पात्रता? शरद पवारांच्या जवळच्या नेत्यानं सांगितलं गणित

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.